शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

लग्नाच्या आदल्या दिवशीच पोलीस शिपाई ‘चतुर्भुज’

By admin | Updated: April 18, 2017 00:20 IST

प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या पोलीस शिपायाला फे्रजरपुरा पोलिसांनी रविवारी रात्री व्यंकय्यापुऱ्यातून अटक केली.

प्रेयसीची पोलिसांत तक्रार : बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखलअमरावती : प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या पोलीस शिपायाला फे्रजरपुरा पोलिसांनी रविवारी रात्री व्यंकय्यापुऱ्यातून अटक केली. एकीशी प्रेमलीला करून दुसरीशीच विवाह करण्याचा या प्रेमवीर पोलिसाचा डाव प्रेयसीने उधळून लावला. तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरूणावर बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.पोलीस सूत्रानुसार भूषण जीवनराम नेमाडे (२७,रा.व्यंकय्यापुरा)असे आरोपीचे नाव आहे. आरोपी भूषण नेमाडे हा अकोला जिल्ह्यातील माना पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. तेथील पोलीस उपनिरीक्षकाचा ‘रायटर’ म्हणून तो काम सांभाळतो. दोन वर्षांपूर्वी त्याचे एका २३ वर्षीय मुलीशी प्रेमसूत जुळले होते. लग्नाचे आश्वासन देऊन त्याने तिच्यावर शेगाव, माना कुरुम व व्यंकय्यापुऱ्यातील त्याच्या घरी वारंवार लैंगिक अत्याचार केले, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. दोन दिवसांपूर्वी भूषणचा विवाह धामणगाव येथील एका मुलीशी होणार असल्याची माहिती पीडितेला मिळाली. भूषणने आपली फसवणूक केल्याचेही तिच्या लक्षात आले. तिने भूषणची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निर्णयावर ठाम राहिला. भूषणचे शुभमंगल मंगळवारी १८ एप्रिल रोजी असल्यामुळे रविवारी पीडितेने फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून भूषण नेमाडेविरूद्ध तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भूषणविरूद्ध भादंविच्या कलम ३७६, ४१७, अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदविला आहे.गुन्हा दाखल होऊनही आरोपीला पोलिसांनी अटक केली नसल्याने मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेतली. त्यानंतर तातडीने रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास फ्रेजरपुरा पोलिसांनी भूषण नेमाडेला अटक केली. वधुपक्षाची फे्रजरपुरा ठाण्यात धावरविवारी रात्री फे्रजरपुरा पोलिसांनी भूषण नेमाडेला अटक केल्याची माहिती त्याच्या नियोजित वधूच्या कुटुंबाला मिळताच त्यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठून सत्यता जाणून घेतली. पहाटे ४ वाजताच्या सुमारास वधुपक्षाचे काही सदस्य फे्रजरपुरा ठाण्यात आले. त्यांनी ठाणेदार पंजाब वंजारी यांच्याशी चर्चा केली असता भूषणविरूद्ध फसवणुकीची तक्रार करता येईल, असे वंजारी यांनी त्यांना सांगितले. लग्नमंडपी पसरली अवकळा डोळ्यांत शेकडो स्वप्ने घेऊन आपल्या नवरदेवाची प्रतीक्षा करणाऱ्या ‘त्या’ निर्दोष वधुला मात्र नाहक मन:स्ताप सोसावा लागला. आधी एका तरूणीची फसवणूक करून विवाह करू पाहणाऱ्या नवरदेवाला लग्नाचा आदल्या दिवशीच पोलिसांनी उचलून नेल्याने धामणगाव तालुक्यातील ‘त्या’ गावात नि:शब्द शांतता पसरली होती. विवाह मंडपातील लगबग आणि उत्साह क्षणात विरला. मंडपात वऱ्हाड्यांसाठी शिजविलेले अन्न तसेच राहिले. मात्र, उच्चशिक्षित वधुने परिस्थिती अतिशय सक्षमपणे हाताळली. स्वत:ला सांभाळून तिने कुटुंबियांनाही धीर दिला. लग्नापूर्वीच नवरदेवाचा खरा चेहरा कळल्याने फसवणूक टळल्याचे समाधान वधुपक्षाच्या चेहऱ्यावर दिसत होते. भूषणवर निलंबनाची टांगती तलवारभूषण नेमाडे हा माना पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत फ्रेजरपुराचे ठाणेदार वंजारी यांनी अकोला येथील पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मीना यांनी कळविले आहे. त्यामुळे आता भूषणवर निलंबनाची टांगती तलवार लटकत आहे.