शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर गुंडांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 11:14 IST

अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी शांतीलाल पटेल यांच्यावर मंगळवारी पहाटे शहरातील कुख्यात पाच ते सात गुंडांनी रॉड व सळईने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी अमरावती येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ठळक मुद्देतीन महिन्यातील जिल्ह्यातील दुसरी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी शांतीलाल पटेल यांच्यावर मंगळवारी पहाटे शहरातील कुख्यात पाच ते सात गुंडांनी रॉड व सळईने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी अमरावती येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.सोमवारी रात्री पोलीस कर्तव्यावर असलेली अधिकारी शुभांगी ठाकरे यांनी या सात ते आठ आरोपींना दारू पिताना बघितले असता काहीजण तिथून पळाले, तर काहींना पोलिसी खाक्या दाखविला व काही वेळा नंतर सोडून देण्यात आले. या आरोपींनी आपल्याला मारहाण केल्याचा राग मनात धरून पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ठाकरे हिचा पाठलाग केला. पण त्या पहाटेपर्यंत या आरोपींना कुठेच गवसल्या नाहीत. त्याचवेळी पोलीस स्टेशनमधून घरी जात असलेल्या पोलीस कर्मचारी सहा. पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल चुणीलाल पटेल (५२) यांना अडवून रॉड व सलाखीने डोक्यावर वार केले. यामध्ये शांतीलाल पटेल गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच यातील तीन कुख्यात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक आरोपींचा शोध घेतला जात आहे.ग्रामीण रुग्णालयात अधिकाऱ्यांच्या भेटी,अमरावती जिल्ह्या रुग्णालयात पोलिस उपअधीक्षक गृह शिरीष राठोड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर व किरण वानखडे यां अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे,तीन महिन्यातील दुसरी घटनाया आधी चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनमधील सतीश मडावी या पोलीस कर्मचाऱ्यावर सुद्धा २७ मे ला अशाच प्रकारे हल्ला झाला होता. त्यामध्ये तो मृत्यू पावला होता. या घटनेला तीन महिने होत नाही तर ही दुसरी घटना जिल्ह्यामध्ये घडली आहे,

टॅग्स :Murderखून