शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे ‘मिशन शांतता’ सक्सेसफुल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 05:00 IST

ध्वनिप्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० अन्वये शांतता क्षेत्रात व शांतता क्षेत्राच्या १०० मीटर परिसरात ध्वनिक्षेपक लावण्यास वापरास व कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ध्वनिप्रदूषण अधिनियमान्वये गुन्हा दाखल होईल व सदर गुन्हा शाबितीनंतर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ अन्वये पाच वर्षांपर्यंत कैद व एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोगे न हटविल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा दिला आहे. त्या इशाऱ्यानंतर निर्माण होणारा संघर्ष टाळण्यासाठी शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आयुक्तालय हद्दीत भोंग्यावरून कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या जात असताना शहर पोलिसांनी ‘मिशन शांतता व नियमांचा जागर’ हाती घेतला आहे. शहरातील १८३ पैकी बहुतांश मशिदीतील पहाटेची अजान भोंग्याविना झाल्याने पोलिसांचे ते ‘मिशन सक्सेसफुल’ ठरल्याचे आशादायी चित्र आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह व उपायुक्तद्वयाने हेल्पलाइन, मुस्लीम धर्मगुरू व विश्वस्तांसोबत मॅराथॉन बैठकी घेत आहेत. त्यात  संबंधितांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत अवगत करण्यात आले. ध्वनीप्रदुषण केल्यास कुठल्या परिणामाला सामोरे जावे लागते, याबाबतही ठाणेस्तरावर जनजागर केला जात आहे. 

मुस्लिम धर्मगुरूंनी स्वत: घेतला पुढाकार विशेष म्हणजे शहरातील अनेक  मुस्लीम धर्मगुरूंनी पहाटे ५ वाजता भोंगे न वाजवता नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पोलीस आयुक्तालयाने शहरातील सर्वच प्रार्थनास्थळांना भोंग्याच्या परवानगीसाठी आठ पानी अर्ज दिला आहे. तो अर्ज शपथपत्रासह माहिती व आवश्यक दस्तावेजासह भरून दिल्यानंतरच भोंग्यांना परवानगी दिली जाणार आहे.

ध्वनिप्रदूषण सिद्ध झाल्यास पाच वर्षे कैद

धार्मिक प्रार्थनास्थळी लाऊड स्पीकर वापरासाठी नव्याने परवानगी अर्ज भरून घेतल्या जात असून, त्या अर्जांमध्ये  अधिनियमाचा ऊहापोह करण्यात आला आहे. ध्वनिप्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० अन्वये शांतता क्षेत्रात व शांतता क्षेत्राच्या १०० मीटर परिसरात ध्वनिक्षेपक लावण्यास वापरास व कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ध्वनिप्रदूषण अधिनियमान्वये गुन्हा दाखल होईल व सदर गुन्हा शाबितीनंतर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ अन्वये पाच वर्षांपर्यंत कैद व एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. 

काय आहेत पोलिसांचे आदेश? 

पोलिसांकडून मिळालेली परवानगी डीजेसारख्या ध्वनिक्षेपणासाठी नसून नियमित ध्वनिक्षेपक यंत्रणेसाठी देण्यात येणार आहे. ध्वनिप्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० अन्वये दिवसा ६ ते रात्री १० वाजताच्या मर्यादेतच आहे. परवानगीच्या विहीत वेळेनंतर ध्वनिक्षेपक बंद न केल्यास  संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कार्यवाही होईल.

तर परवानगी होईल रद्द अर्जामध्ये नमूद केलेली ध्वनिक्षेपकाची जागा, संख्या परवानगी प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय बदलता येणार नाही. एकापेक्षा अधिक भोंगे वाजविले जात असल्यास त्यांची एकत्रित ध्वनी तीव्रता निर्धारित मर्यादेच्या पुढे जाणार नाही. याची खबरदारी संबंधित प्रार्थना स्थळांना घ्यावी लागणार आहे. 

 

टॅग्स :Policeपोलिस