शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनो, शरीरयष्टी चांगली ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:20 IST

जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांनी आपली शरीरयष्टी चांगली ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचवेळी ते जनतेच्या सुरक्षेसाठी धावपळ करू शकतात, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी पोलीस व्यायाम शाळेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

ठळक मुद्देपालकमंत्री प्रवीण पोटे : पोलीस व्यायाम शाळेचे उद्घाटन थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांनी आपली शरीरयष्टी चांगली ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचवेळी ते जनतेच्या सुरक्षेसाठी धावपळ करू शकतात, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी पोलीस व्यायाम शाळेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.पोलीस आयुक्तालयातील पोलिसांसाठी पोलीस मुख्यालय येथे पोलीस (जीम) व्यायाम शाळेचे सोमवारी उद्घाटन झाले. कार्यक्रमात पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, यशवंत सोळंके, प्रदीप चव्हाण मंचावर होते. पालकमंत्र्यांनी पोलिसांच्या उत्तम कामगिरीचे अभिनंदन केले. पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेचे व्रत घेतले असून, त्यासाठी ते अहोरात्र झटतात. त्याच्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहित करायलाच हवे, असे ना. पोटे म्हणाले. मी पोलीस विभागाच्या पाठीशी आहे, पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेसोबत स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, त्यासाठी व्यायाम करून शरीरयष्टी उत्तम ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक शैलेंद्र कस्तुरे व सायबरचे एपीआय कांचन पांडे, तर आभार प्रदर्शन पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी केले.व्यायाम शाळेच्या उद्घाटनाप्रसंगी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाºया पोलिसांना प्रशस्तीप्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सायबरचे कांचन पांडे, पीएसआय ईश्वर वर्गे, गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे, पीएसआय शंकर डेडवाल, गुन्हे शाखेचे पीएसआय राम गिते, वलगावचे ठाणेदार दुर्गेश तिवारी, वाहतूक शाखेचे अर्जुन ठोसरे, गागुर्डे, नांदगाव पेठचे कैलास पुंडकर, महिला सेलच्या नीलिमा आरज, राजापेठचे किशोर सूर्यवंशी, कोतवालीचे दिलीप पाटील, फ्रेजरपुºयाचे आसाराम चोरमले, नागपुरी गेटचे दिलीप चव्हाण, बडनेराचे शरद कुळकर्णी यांच्यासह पीएसआय सुदाम आसोरे, गणेश अहिरे, प्रशांत जंगले यांच्यासह आदींना गौरविण्यात आले.सीपींच्या मनोगतात ‘लोकमत’चा उल्लेखपोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पोलिसांना जनतेसोबत संपर्क वाढवावा व जनतेला विश्वास घेऊन त्यांच्या सहकार्याने आपले काम करावे, तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी व्यायामशाळेचा उपयोग घेऊन आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असा सल्ला दिला. याशिवाय पोलिसांनी विशेष परिश्रम घेतल्याने कन्व्हेक्शनचा रेषो वाढविण्यात यश मिळाल्याचे सांगून 'लोकमत'च्या वृत्ताचाही उल्लेख केला.