शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

इंधन वेचणाऱ्याला लागली पोलिसांची गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:39 IST

एसआरपीएफ कॅम्प परिसरातील मैदानावर पोलिसांकडून गोळीबाराचा सराव सुरू असताना इंधन वेचणाऱ्या एका इसमाला गोळी लागली.

ठळक मुद्देएसआरपीएफ कॅम्प ग्राऊंडवरील घटना : ‘तो’ दिवसभर घटनास्थळावरच होता पडून

आॅनलाईन लोकमतअमरावती : एसआरपीएफ कॅम्प परिसरातील मैदानावर पोलिसांकडून गोळीबाराचा सराव सुरू असताना इंधन वेचणाऱ्या एका इसमाला गोळी लागली.राजू मोहन सरसोदे (३५,रा. वडाळी) असे जखमीचे नाव असून, त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून नागपूर हलविण्यात आले आहे.सोमवारी सकाळी पोलिसांनी झाडलेली गोळी राजूला लागल्यावर तो घटनास्थळीच पडून होता. सायंकाळी ४ वाजता एसआरपीएफ कॅम्पमधील काही पोलिसांना तो जखमी अवस्थेत आढळला. काही पोलिसांना गोळी झाडण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.फ्रेजरपुरा ठाणेदारांची भेटहा परिसर लाल झेंडे लावून मानवी शिरकावास प्रतिबंधित केला जातो. येते. ही बाब दंवडी पिटवून व बिगूल वाजवून सांगण्यात येते. सोमवारी सकाळी या क्षेत्रात लाकूडफाटा गोळा करणाऱ्या राजूच्या मांडीचा एका गोळीने वेध घेतला. तो जखमी होऊन खाली पडला. या घटनेची भनक पोलिसांना नव्हती. प्रशिक्षणाचे तास संपल्यानंतर पोलीस तेथून निघून गेले. मात्र, सायंकाळी ४ वाजता काही जवानांना राजू जखमी अवस्थेत आढळला. त्यांनी तत्काळ राजूला इर्विन रुग्णालयात नेले, अन्यथा मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. फ्रेजरपुराचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी रुग्णालयात जाऊन घटनेचा आढावा घेतला.

पोलीस प्रशिक्षणात गोळी झाडण्याचा सराव करण्यापूर्वी बिगूल वाजवून, झेंडे लावून सूचना देण्यात येते. हा अपघात असून, नियमानुसार कारवाई करण्यात येईल.- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त, अमरावती शहर.