जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार, दुपारी ४ वाजेपर्यंत हॉटेलला मुभा आहे. मात्र, त्यानंतर तेथे ग्राहकांना जेवन ‘सव्हर् करण्यास मनाई आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या त्या आदेशाची पायमल्ली करत अनेक हॉटेल्स व खानावळींमध्ये रात्री १० ते ११ वाजेपर्यंत ग्राहकांना तेथेच बसून जेवन उपलब्ध करून दिले जाते. राजापेठ व अन्य पोलिसांनी २४ जुलै रोजी केलेल्या कारवाईमुळे ते स्पष्ट झाले आहे. धाबा परिसरातील खुनाच्या पाशवर्रभूमिवर पोलीस यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. त्याचा परिपाक म्हणून २४ च्या रात्री डझनभराच्या आसपास बार, हॉटेलवर कारवाई करण्यात आली.
येथे झाली कारवाई
नांदगाव पेठ पोलिसांनी हॉटेल रेवावर २३ जुलै रोजी रात्री ११.१५ वाजता, पीआय गांगुर्डे यांनी २४ जुलै रोजी ५.२० वाजता हॉटेल वर्हाडी तडका, रहाटगाव, हॉटेल सावजी रहाटगाव, गौरीईन हाॅटेल, गाडगेनगर पोलिसांनी आदर्श बार ॲन्ड रेस्टारंट, वलगाव पोलिसांनी दिप वाईन बार ॲन्ड रेस्टारंट यांचेविरूद्ध कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर, राजापेठ पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेने पाच हॉटेल, बार सिल केले होते.