शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोळा ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

दरवर्षी गाव, खेडी, शहरातसुद्धा पोळ्यानिमित्त शेतकरी बैलाची सजावट, रंगरंगोटी करून पूजा-अर्चा करतात. मात्र, कोरोनामुळे शेतकऱ्यांनी घरीच बैलाचे पूजन, नैवद्य व अन्य विधिवत कार्य आटोपते घेतले. यंदा पोळ्याच्या सणाला फारसा उत्साह दिसून आला नाही. काही शेतकऱ्यांनी कुटुंबांतच बैलांचे पूजन करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

ठळक मुद्देशेतक ऱ्यांकडून घरीच पूजन : कोरोना संसर्गाचा परिणाम, सामूहिक पोळा उत्सवावर विरजन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा कोरोना संसर्गामुळे पोळा उत्सव सार्वत्रिकरीत्या साजरा करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने मनाई केली. त्यामुळे हा उत्सव घरीच मंगळवारी अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.दरवर्षी गाव, खेडी, शहरातसुद्धा पोळ्यानिमित्त शेतकरी बैलाची सजावट, रंगरंगोटी करून पूजा-अर्चा करतात. मात्र, कोरोनामुळे शेतकऱ्यांनी घरीच बैलाचे पूजन, नैवद्य व अन्य विधिवत कार्य आटोपते घेतले. यंदा पोळ्याच्या सणाला फारसा उत्साह दिसून आला नाही. काही शेतकऱ्यांनी कुटुंबांतच बैलांचे पूजन करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. अमरावती येथील नेहरू मैदान, राजापेठ परिसर, पंचवटी चौकालगतच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या रूरल इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात होणारा पारंपरिक पोळा उत्सव साजरा झाला नाही. परिणामी बैल सजावट स्पर्धांनाही ब्रेक लागला.बडनेरा, वलगाव येथे सार्वत्रिक पोळा उत्सव साजरा झाला नाही. मध्यवर्ती कारागृहातील बैलांची रंगरंगोटी करून साज करण्यात आला होता. अधीक्षक रमेश कांबळे यांच्या हस्ते बैलांचे पूजन करून नैवेद्य खाऊ घालण्यात आले. ग्रामीण भागात रस्त्यांवर शुकशुकाट होता.पोलिसांकडून सूचनाग्रामीण भागात सार्वत्रिक पोळा सण साजरा होणार नाही, अशा सूचना पोलिसांनी सोमवार व मंगळवार अशा दोन दिवस सलग केल्या होत्या. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पोलीस ठाणेनिहाय सरपंच, पोलीस पाटलांच्या बैठकी घेऊन पोलिसांनीही निर्देश दिले.बैलांच्या पाठीवर ‘स्लोगन’तिवसा : कोरोनाच्या सावटातही मंगळवारी बैल पोळा सण साजरा करण्यात आला. तिवसा येथील शेतकºयांनी बैलाच्या पाठीवर आकर्षक व लक्षवेधी स्लोगन लिहिले. देशात सध्या अभिनेता सुशांतसिंग आत्महत्याप्रकरण गाजत आहे. यात एका बैलाच्या पाठीवर सुशांतसिंग व शेतकरी असे लिहून शेतकरी आत्महत्या व सुशांतसिंगची तुलना करण्यात आली. याशिवाय कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजगार बुडाला. लॉकडाऊनविरोधात शेतकरीसुद्धा आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र रेखाटण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या