शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

वनजमिनींवर पोकलँडने खोदकाम

By admin | Updated: October 26, 2016 00:17 IST

वनजमिनीवर यंत्र अथवा मशीनद्वारे खोदकाम करता येत नसताना खासगी कंपनीच्यावतीने वनजमिनींवर ...

मशीन जप्त : सालोड-कारंजा मार्गावर भूमिगत केबलची कामेअमरावती : वनजमिनीवर यंत्र अथवा मशीनद्वारे खोदकाम करता येत नसताना खासगी कंपनीच्यावतीने वनजमिनींवर पोकलँडने भूमिगत आॅप्टिकल फायबर केबलची कामे युद्धस्तरावर केली जात आहेत. याप्रकरणी वनविभागाने खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध वनगुन्हे नोंदवून पोकलँड ताब्यात घेतला.सालोड ते कारंजा मार्गावर भूमिगत आॅप्टिकल फायबर केबलची कामे सुरू आहेत. खासगी, शासकीय जमिनींवरदेखील केबल टाकले जात आहेत. मात्र कंत्राटदाराने वनजमिनीवर खोदकाम करण्याचा प्रताप केला आहे. सालोड हे क्षेत्र बडनेरा वर्तुळात गणले जात असून सुमारे तीन किमी अंतरापर्यंत वनजमिनीवर अवैध उत्खनन करण्यात आले आहे. मंगरुळ चव्हाळा बीटमध्ये सदर खोदकाम येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बडनेराच्या वनपाल वर्षा हरणे यांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने हाताळले असून वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्या मार्गदर्शनात नागपूर येथील कंत्राटदार योगेंद्र हिरालाल यादव यांच्याविरुद्ध वनगुन्हे दाखल करून पोकलँड ताब्यात घेतला आहे. सदर खोदकाम करण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राटदाराला मिळालीे आहे. रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर अंतरावर केबल टाकण्याची परवानगी असल्याची माहिती आहे. मात्र सालोड ते कारंजा मार्गावर वनजमिनीवर ५९१ रनिंग मीटर अवैध खोदकाम करण्यात आले आहे. यात काही झाडे, झुडपांची हानीदेखील झाली आहे. परिणामी या प्रकरणी वनविभागाने गुन्हे दाखल केले आहे. वनजमिनीवर पोकलँडने खोदकाम केल्याप्रकरणी ते जप्त करण्यात आले आहे. पोकलँड जप्त केल्याप्रकरणीे वनविभागाने ही माहिती न्यायालयाकडे सादर केली आहे. सदर खोदकाम वनजमिन वगळता अन्य क्षेत्रात सुरु असल्याची माहिती आहे.पोकलँड ताब्यात घेऊन चौकशी सुरुबडनेरा वनवर्तुळांतर्गत येणाऱ्या सालोड ते कारंजा मार्गावरील वनजमिनीवर पोकलँडने खोदकाम केल्याप्रकरणी ते ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी आरंभली आहे. याप्रकरणाची सत्यता तपासून वनसंवर्धन कायदा १९८० तसेच भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (ड) व २६ (अ) नुसार पुढील कारवाई करण्याची तयारी वनविभागाने चालविली असल्याची माहिती आहे.वनजमिनीवर खोदकाम केल्याप्रकरणी वनगुन्हे दाखल करुन पोकलँड ताब्यात घेतले आहे. सदर कंत्राटदाराकडे खोदकामाची परवानगी आहे. परंतु वनजमिनीवर खोदकाम प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.- हरिश्चंद्र पडगव्हाणकरवनपरिक्षेत्राधिकारी, वडाळी