शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
3
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
4
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
5
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
6
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
7
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
8
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
9
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
10
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
11
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
12
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
13
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
14
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
15
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
16
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
17
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
18
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
19
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
20
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

घोटा गावातील तीन चिमुकल्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

घोटा गावातील रहिवासी किशोर बेठेकर यांची शेती गावातीलच गणपत खंडारे यांच्या शेताजवळ आहे. खंडारे यांच्याकडे म्हशी असल्याने किशोर बेठेकर हे त्यांच्याकडून दूध आणतात. सोमवारी सायंकाळी बेठेकर यांनी शेतातून येताना एक लिटर दूध आणले. ते दूध रात्री गरम करून ठेवले. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास त्यांचे गणेश (३ वर्षे), कृती बेठेकर (५ वर्षे) व करिना (२ वर्षे) या चिमुकल्यांनी दूध प्राशन केले.

ठळक मुद्देकारण अस्पष्ट : उपजिल्हा रुग्णालयात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यातील घोटा गावातील तीन चिमुकल्यांना मंगळवारी सकाळी विषबाधा झाल्याने त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नालट यांनी स्पष्ट केले.घोटा गावातील रहिवासी किशोर बेठेकर यांची शेती गावातीलच गणपत खंडारे यांच्या शेताजवळ आहे. खंडारे यांच्याकडे म्हशी असल्याने किशोर बेठेकर हे त्यांच्याकडून दूध आणतात. सोमवारी सायंकाळी बेठेकर यांनी शेतातून येताना एक लिटर दूध आणले. ते दूध रात्री गरम करून ठेवले. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास त्यांचे गणेश (३ वर्षे), कृती बेठेकर (५ वर्षे) व करिना (२ वर्षे) या चिमुकल्यांनी दूध प्राशन केले. त्यासोबतच घरात असलेले रात्रीचे शिळे अन्न जेवले. सकाळी ११ च्या सुमारास त्या तिन्ही चिमुकल्यांना अचानक वांत्या होण्यास सुरुवात झाली. किशोर बेठेकर यांनी त्यांना दुचाकीने तात्काळ उतावली येथील महात्मा गांधी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर तेथील रुग्णवाहिका देऊन धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.तिन्ही बालकांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.शिळे अन्न व दूध हा अन्नाचाच प्रकार आहे. चिमुकल्यांवरील उपचारादरम्यान त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले.- डॉ. अमोल नालटवैद्यकीय अधीक्षक, धारणी

टॅग्स :hospitalहॉस्पिटल