आरक्षण डावलून नियुक्ती : आयुक्तांना अंधारात ठेवून कामकाजअमरावती : महापालिकेत सामान्य प्रशासन विभागातील काही महाभागांनी बिंदुनामावलीत खोडतोड करून नियुक्ती मिळविल्याची माहिती समोर आली आहे. यात तीन वरिष्ठ लिपिकांनी नियमबाह्यरीत्या पदोन्नती मिळविली असून आयुक्तांना अंधारात ठेवून हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.बिंदुनामावलीत खोडतोड केल्यामुळे सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. सामान्य प्रशासना विभागात १० ते १२ प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना आरक्षणाचे लाभ मिळणे अपेक्षित होते. मात्र बिंदू नामावलीत खोडतोड केल्यामुळे आरक्षणापासून काही कर्मचारी वंचित ठेवण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. सामान्य प्रशासन विभागाने काही बाबी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यापासूनही लपवून ठेवल्या आहेत. बिंदुनामावलीत खोडतोड केल्यामुळे नियमती कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला हा मोठ्या झटका मानला जात आहे. बिंदुनामावलीचे रेकॉर्ड तपासले तर पेन्सिलने बऱ्याच खोडतोड केल्याचे वास्तव समोर येईल, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. खोडतोड करून काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रकार घडला आहे. या पदोन्नतीला मान्यता देखील नसल्याची माहिती आहे. गत काही वर्षांपूर्वी महापालिकेत बिंदुनामावलीत खोडतोड करून नियमबाह्यरीत्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून बिंदुनामावलीत खोडतोडप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. सामान्य विभागात बिंदुनामावलीत खोडतोड करून आरक्षण डावलले जात असल्याप्रकरणी प्रभारी अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)
बिंदुनामावलीत खोडतोड!
By admin | Updated: February 29, 2016 00:09 IST