शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पीएनबी घोटाळा : अमरावतीचा व्यापारी अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:41 IST

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी याने अमरावती येथील एका बड्या व्यावसायिकाची कोट्यवधीने फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देबनावट हिरेप्रकरण : शहरातील अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याची शक्यता, कोतवाली पोलीस सतर्क

आॅनलाईन लोकमतअमरावती : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी याने अमरावती येथील एका बड्या व्यावसायिकाची कोट्यवधीने फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. गीताजंली ज्वेलर्सची फ्रेन्चायसी घेऊन या व्यावसायिकाने राजकमल चौक स्थित लढ्ढा मॉलमध्ये प्रतिष्ठान थाटले. मात्र, वर्षभरातच प्रतिष्ठानाला टाळे लागले.पीएनबी घोटाळ्यातील आरोपी निरव मोदी व मेहुल चोकसी यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे औरंगाबाद, ठाणे कोलकाता, दिल्ली यांसह देशभरात ३८ ठिकाणी सोमवारी धाडी घालण्यात आल्या. सन २०१३ ते २०१७ या काळात चोकसी व मोदी यांनी देशभरातील विविध व्यावसायिकांना डायमंड ज्वेलरीच्या फ्रेन्चायसी दिल्या. यात अमरावतीच्या माहेश्वरी समाजातील एका बड्या व्यावसायिकाने फ्रेन्चायसी घेतली. गीताजंली ज्वेलर्स नावाने उघडलेल्या या प्रतिष्ठानातून त्यांनी हिºयांची विक्रीसुद्धा सुरू केली. मात्र, काही दिवसांनंतर कंपनीकडून पाठविण्यात आलेले हिरे बनावट असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. कंपनीशी सपर्क साधून त्यांनी आक्षेप नोंदविला व गुंतवविलेली रक्कम परत मागितली. सोबतच त्यांनी मोदी व चोकशी यांच्या कंपनीचे शेअर विकत घेतल्याने त्यांना मोठा फटका बसला. गुंतविलेली रक्कम परत मिळविण्यासाठी तो व्यावसायिक मागील अनेक दिवसांपासून मुंबईच्या फेऱ्या घालत आहे. पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर ते प्रचंड अस्वस्थ झाल्याची प्रतिक्रिया सराफा बाजारात आहे.गीतांजलीच्या ‘त्या’ प्रतिष्ठानाला टाळेमाहितीनुसार सुमारे दीड वर्षांपूर्वी राजकमल चौक स्थित लढ्ढा मॉलमध्ये अमरावतीच्या व्यावसायिक वर्तुळात बडे नाव असलेल्या त्या व्यावसायिकाने गीतांजली ज्वेलर्स नावाने प्रतिष्ठान उघडले. त्यातून हिºयाच्या दागिन्यांची विक्री सुरू केली. मेहुल चोकसीच्या मालकीची हिरे निर्मिती कंपनीची आकर्षक जाहिरात पाहून त्यांनी फ्रेन्चायसी मिळविली होती. अमरावतीमध्ये पहिल्यादाच गीतांजली ब्रँडनेमने हिºयांच्या दागिन्यांची विक्री होत असल्याने अमरावतीकरांच्याही उड्या पडल्या. मात्र, अचानक सहा महिन्यांपूर्वी या प्रतिष्ठानाला टाळे लागल्याची माहिती शेजारी असलेल्या व्यावसायिकांनी दिली.सीव्हीसीचे दल अमरावतीत येणारकेंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) या घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. हा घोटाळा नेमका झाला कसा, यासाठी विविध ठिकाणी धाडी घालण्याचे सत्र सुरू केले आहे. मेहुल चोकसीने ज्या-ज्या शहरांमध्ये गीतांजली ज्वेलर्सचे फ्रेन्चायसी दिली, त्या-त्या शहरांमधून फसवणूक झालेल्या व्यावसायिकांची माहिती घेतली जात आहे. अमरावतीच्या या स्थानिक व्यावसायिकाचीही याबाबत ईडीकडून चौकशी होणार असल्याचे संकेत आहेत. पीएनबी घोटाळ्यात स्थानिक व्यावसायिक कोट्यवधीने फसल्याच्या माहितीला काही सराफा व्यावसायिकांनी दुजोरा दिला आहे.