जागोजागी पडले खड्डे : अक्षम्य दुर्लक्षस्
चांदूर रेल्वे : तालुक्यातील येरड ते चांदूरखेडा या नागपूर-औरंगाबाद सुपर एक्स्प्रेस हायवेपर्यंत दोन किलोमीटर व येरड ते सुलतानपूर या चार किमी रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. या दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण उखडून रस्त्याची गिट्टी बाहेर निघाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याचे दिसत आहे. परिमाणी, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. मात्र, संबंधित विभागाचे या रस्त्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.
राज्यात महामार्गाच्या रस्त्याची कामे मोठ्या जोमात सुरू असून, त्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र, ग्रामीण भागातील रस्त्यांकडे सरकारचे दुर्लक्ष असून, पाठ फिरविल्याचे दिसत आहे. येरड-चांदूरखेडा व सुलतानपूर या रस्त्याने मोठी वाहतूक असून, या दोन्ही रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असल्याने कधीही अपघात होऊ शकतो. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती लवकर व्हावी, असा सूर जनतेमधून उमटत आहे. लोकप्रतिनिधी लक्ष देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.