लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : १८१५ मध्ये इंग्रजांच्या काळात चार एकर जमिनीवर पथ्रोट पोलीस ठाण्याची वास्तू बांधण्यात आली होती. जराजर्जर झालेल्या या इमारतीचे रूपडे केव्हा पालटणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.पथ्रोट पोलीस ठाण्याच्या वास्तूत कर्मचारी निवास आहेत. या दोन्ही वास्तू १०५ वर्षांच्या झाल्या आहेत. गतवर्षी ठाण्याच्या इमारतीकरिता शासनातर्फे निधी मिळाला. बांधकाम होऊन त्या इमारतीमध्ये तीन महिन्यांपासून पोलीस कारभाराला सुरुवातही झाली. मात्र, इंग्रजाच्या काळातील १८ कर्मचारी निवासाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. भिंतींना तडे गेले, तर काही भिंतीच खचल्या आहेत. दाराचे लाकूड सडक्या अवस्थेत आणि छतावरील टिनाला झरे पडल्यामुळे पावसाळ््या हमखास पाणी झिरपते.या कर्मचारी निवासाची बांधकाम विभागातर्फे अधूनमधून तात्पुरती डागडुजी करण्यात येत होती. अशा जीर्ण झालेल्या क्वार्टरमध्ये पोलीस कुटुंबे जीव धोक्यात टाकून राहतात. स्वत:चे खासगी आयुष्य टाळून सार्वजनिक सुरक्षेच्या मोहिमेवर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी सुरक्षित निवास नसल्याची शोकांतिका पथ्रोट पोलीस ठाण्यात कैक वर्षांपासून आहे. पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३८ लहान-मोठी खेडी आहेत. ८० ते ९० हजार लोकसंख्येच्या सुरक्षेची जबाबदारी पाच बीटमधून पाहिली जाते. कर्मचाºयांची संख्या पाहता, क्वार्टरची संख्यादेखील वाढवावी, अशी मागणी पोलीस कुटुंबीयांमधून होत आहे.कर्मचारी हा पोलीस प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे. त्यांच्यावरच पोलीस प्रशासनाचा कारभार चालतो. त्यांचे राहणीमान व सुविधाचा विचार होणे गरजेचे आहे.-मनोज चौधरी,ठाणेदार, पथ्रोट
पथ्रोटच्या पोलीस वसाहतीची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:01 IST
पथ्रोट पोलीस ठाण्याच्या वास्तूत कर्मचारी निवास आहेत. या दोन्ही वास्तू १०५ वर्षांच्या झाल्या आहेत. गतवर्षी ठाण्याच्या इमारतीकरिता शासनातर्फे निधी मिळाला. बांधकाम होऊन त्या इमारतीमध्ये तीन महिन्यांपासून पोलीस कारभाराला सुरुवातही झाली. मात्र, इंग्रजाच्या काळातील १८ कर्मचारी निवासाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. भिंतींना तडे गेले, तर काही भिंतीच खचल्या आहेत.
पथ्रोटच्या पोलीस वसाहतीची दुर्दशा
ठळक मुद्देप्रस्ताव बेदखल : शतकोत्तर इमारत, पालकमंत्र्यांपुढे मांडल्या व्यथा