शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

महापालिकेची ग्रामपंचायतच करा ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:15 IST

महापालिकेत विकासाच्या केवळ बाता केल्या जातात; प्रत्यक्षात बोंब आहे. दोन वर्षात एकही विकासकाम झालेले नाही. नादारीच्या अवस्थेला आलेल्या महापालिकेची आता ग्रामपंचायतच करा म्हणजे कोणालाच जास्तीचे मानधन देण्याची गरज राहणार नाही.

ठळक मुद्देकाँग्रेस आक्रमक : महापौर अनुपस्थित, त्यांच्या खुर्चीला चिटकविले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेत विकासाच्या केवळ बाता केल्या जातात; प्रत्यक्षात बोंब आहे. दोन वर्षात एकही विकासकाम झालेले नाही. नादारीच्या अवस्थेला आलेल्या महापालिकेची आता ग्रामपंचायतच करा म्हणजे कोणालाच जास्तीचे मानधन देण्याची गरज राहणार नाही. जे शासन देवस्थानकडून ५०० कोटींचा निधी उधार घेते, ते आता अमरावती महापालिकेला काहीच देऊ शकणार नाही, अशा उपरोधिक निवेदन काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारी महापौरांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खुर्चीला चिकटविले व आयुक्तांना आपल्या मागण्या कळविल्या.निवेदनानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकल बॉडीला जे अधिकार बहाल केले, त्याचे सर्रासपणे उल्लंघन सुरू आहे. महापालिकेच्या हद्दीत मागासवस्तीची कामेसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली जात आहेत. मागील दोन वर्षांपासून सफाई कंत्राटाने अंतिम स्वरूप धारण केलेले नाही. अशा निष्क्रिय सत्ताधारी प्रशासनाला शहरातील नागरिकांची किती पर्वा आहे, हेही आता उघड झालेले आहे.महापालिकेच्या पदाधिकाऱ्याचा सफाई कंत्राटाबाबत झालेला ‘गोपनीय’ संवाद माध्यमांनी फोडला. त्यामुळे महापालिकेची पुरती बदनामी झालेली आहे. या पदाधिकाºयाचे नाव महापालिकेने जाहीर करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. स्मार्ट सिटीच्या नावावर जनतेकडून मिळविलेला दोन कोटींचा महसूल डीपीआरसाठी खर्च केला. प्रत्यक्षात शहर स्मार्ट होण्याऐवजी भकास झाले. खड्ड्यांचे शहर झाले. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका तसेच आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्याप्रमाणे महापालिकेचा निधी बांधकाम विभागाला दिला जात आहे., त्याप्रमाणे शहराच्या साफसफाईचे नियंत्रणसुद्धा त्यांच्याकडेच द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.महापालिका आयुक्तांना निवेदन देणाऱ्या महापालिका सदस्यांमध्ये विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, दिनेश बूब, प्रशांत डवरे, वंदना कंगाले, शेख जफर शेख जब्बार, सलीम बेग युसूफ बेग, प्रदीफ हिवसे, अब्दूल वसीम, हाफीजाबी युसूफ शाह, नीलिमा काळे, सुनीता भेले, मंजूश्री महल्ले, शोभा शिंदे, अस्मा फिरोज खान, हाफीजाबी नूरखाँ, अनिल माधोगडिया यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.म्हणून करा ग्रामपंचायतअमरावती महापालिकेची ग्रामपंचायत केल्यास महापौर, उपमहापौर, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता, नगरसेवक, आयुक्त, उपायुक्त हे कोणतेच पद राहणार नाही. त्यामुळे त्यांचे पगार व मानधन देण्याची गरज भासणार नाही. हा खर्च शहर विकासाकडे वळविता येईल. तसेही आता महापालिकेला शासनाकडून काही निधी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे महापालिकेची ग्रामपंचायतच करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.डेंग्यूमुळे १५ ते २० नागरिकांचा नाहक बळीशहरात आतापर्यंत डेंग्यूमुळे १५ ते २० नागरिकांना जीव गमवावा लागला. साधारणपणे दोन ते तीन हजार नागरिक या जीवघेण्या आजाराने त्रस्त होते. त्याची दखल महापालिकेने घेतली नाही. तीन महिन्यांपासून सुकळीची आग घुमसतच आहे. यामुळे लगतच्या गावांतील नागरिकांना आजार होत असताना महापालिका गंभीर नसल्याचा आरोप यावेळी पदाधिकाºयांनी केला.अमरावती महापालिका अमेरिकेत आहे काय?शहराचा आगामी २० वर्षांचा ‘डीपी’ हा इंग्रजीमध्ये करण्यात आला. त्यामुळे अमरावती महापालिका अमेरिकेतील शहरात असल्याचा प्रशासनाचा समज आहे काय, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोलसह नगरसेवक प्रशांत डवरे यांनी सोमवारी महापालिका प्रशासनाला सुनावले. शहरातील आठ लाख नागरिकांना कळण्यासाठी शहर विकासाचे प्रारूप मराठीत असावे, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. शहरातील आठ लाख नागरिकांना हक्क आहे. तो तुम्हाला डावलता येणार नाही. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे. याविषयी शासन आदेशदेखील असताना विकासाचे नवे प्रारूप इंग्रजीत तयार करण्यात आले. त्याद्वारे घोळ लपविण्याचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला पत्र देऊन हा आराखडा मराठीत करावा तसेच सूचना, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी आयुक्त संजय निपाने यांच्याकडे केली.

टॅग्स :congressकाँग्रेस