शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वॅगन दुरुस्ती कारखान्यात कामगारांच्या जीविताशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 05:00 IST

श्यामकांत सहस्त्रभोजने     लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : बहुप्रतीक्षित वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या उभारणी एक तर धिम्या गतीने होत आहे. ...

ठळक मुद्देकासव गतीने कामकाज

श्यामकांत सहस्त्रभोजने    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुप्रतीक्षित वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या उभारणी एक तर धिम्या गतीने होत आहे. त्यातच या कामावर असणाऱ्या  कामगारांच्या जीविताशी  खेळ होत असल्याचा प्रकार येथे सुरू आहे. यांत्रिकी काम होत असताना आवश्यक सुरक्षा साधनांचा अभाव असल्याने कंपनीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. बडनेऱ्यात वॅगन दुरुस्ती कारखान्याची उभारणी दोन वर्षांपासून होत आहे. दोनशे कोटींहून अधिक किमतीचा हा प्रकल्प २०० एकरांत साकारत आहे. जिल्ह्यातील या सर्वांत मोठ्या प्रकल्पाचे काम कोलकात्याच्या प्रेमको कंपनीकडे देण्यात आले आहे. शंभराहून अधिक कामगार येथे जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. येथील कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात कुठलीच काळजी कंपनीकडून घेतली जात नसल्याचे चित्र आहे. भव्य लोखंडी शेडखाली काम करताना वजनदार वस्तू कामगारांच्या अंगावर पडू शकते. अवजड लोखंडी साहित्याचा येथे वापर होतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामगारांना सेफ्टी हेल्मेट, शूज यांसह त्यांच्या  जीवितास धोका पोहोचू नये, अशा  साधनांची आवश्यकता असते. तथापि, त्या कामगारांना  पुरविण्यात आलेल्या  नाही, असेच चित्र  या ठिकाणी आहे. संबंधित कंपनी व कंत्राटदार कामगारांच्या जीविताशी खेळत आहे. संबंधित कंपनीला कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रश्न का विचारला जाऊ नये, ही बाब शासनासह प्रशासनालाही गांभीर्याने घ्यावी लागणार आहे, अन्यथा याठिकाणी नाहक दुर्घटना घडू शकते.

कासव गतीने कामकाजशहरातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात दूर करणारा प्रकल्प म्हणून वॅगन दुरुस्ती कारखान्याकडे पाहिले जात आहे. त्याच्या उभारणीसाठी कंपनीला ३६ महिन्यांचा अवधी दिला होता. दोन वर्षे उलटून गेली तरी आतापर्यंत अर्धेच काम झाले. आणखी दोन वर्षांचा कालावधी  लागेल, असे बोलले जात आहे. सावकाश काम का होत आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे