शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जिल्हा बँकेपुढे शिवसेनेचे ढोल वाजवा

By admin | Updated: July 11, 2017 00:10 IST

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी सरकारने जाहीर करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी माजी ...

आंदोलन : कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी सरकारने जाहीर करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी माजी आमदार संजय बंड, राजेश वानखडे, प्रशांत वानखडे व शहराध्यक्ष सुनील खराटे आदींच्या नेतृत्वात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रवेशव्दारासमोर ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शहरवासीयांचे लक्ष वेधले.ढोल वाजवीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या मुख्यालयापर्यंत प्रवेश केला. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करून जिल्हानिहाय आकडेवारी प्रसिध्द केली. मात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अद्यापही जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे प्रत्येक बँकेत शेतकऱ्यांची माहिती घेऊन किती जणांना कर्जमाफी मिळाली याची माहिती गोळा करणार आहे. याअनुषंगाने जिल्हा मध्यवती सहकारी बँकेसह सर्वच राष्ट्रीयकृ त बँकांनी कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करावी व त्याची प्रत प्रत्येक शिवसेना शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुखांपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांना द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बंड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हा बँकेचे व्यवस्थापक जे.सी. राठोड यांना निवेदनाव्दारे केली. यावेळी बँकेचे संचालक प्रकाश काळबांडे उपस्थित होते. आंदोलनात नाना नागमोते, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, वैशाली राणे, ज्योती अवघड, शारदा पेंदाम, रेखा मोरे, शाम देशमुख, आशिष धर्माळे, प्रवीण अळसपुरे, अमोल निस्ताने, बाळासाहेब राणे, प्रमोद कोहळे, विकास शेळके, किशोर माहूरे, प्रवीण अब्रुक, प्रदीप गौरखेडे, नीलेश जामठे, बंडू साऊत, उमेश घुरडे, दीपक मदनेकर, स्वराज ठाकरे, राहुल माटोडे, पराग गुळधे व शिवर्सैनिक उपस्थित होते.