शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

खिरगव्हाण ग्रामपंचायतीकडून मुलींसाठी मुदत ठेवीची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 21:57 IST

स्त्री-पुरुष समानतेसाठी आपला हातभार लागावा, या दृष्टिकोनातून तालुक्यातील खिरगव्हाण ग्रामपंचायतीच्यावतीने शनिवार, १७ फेब्रुवरीपासून अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्त्रीजन्माला प्रोत्साहन : सरपंचांची संकल्पना, राज्यातील पहिला प्रयोग

रवींद्र वानखडे ।आॅनलाईन लोकमतवनोजा बाग : स्त्री-पुरुष समानतेसाठी आपला हातभार लागावा, या दृष्टिकोनातून तालुक्यातील खिरगव्हाण ग्रामपंचायतीच्यावतीने शनिवार, १७ फेब्रुवरीपासून अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. गावात मुलगी जन्माला आली, तर तिच्या नावाने ग्रामपंचायत दोन हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट करेल, शिवाय आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलींच्या नावानेसुद्धा दोन हजार रुपये जमा केले जातील.सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांच्या संकल्पनेतून ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. खिरगव्हाण (समशेरपूर) हे एक हजार लोकसंख्येचे छोटेसे गाव. ग्रामपंचायतच्यावतीने स्त्रीजन्म प्रोत्साहनाला चालना देणारी अभिनव योजना सुरू करण्यात आली असून, महाराष्ट्रातील हा प्रथमच उपक्रम असावा.ग्रामपंचायत हद्दीत मुलगी जन्माला आल्यास तिच्या नावे दोन हजार रुपये फिक्स डिपॉझिट करण्यात येईल, शिवाय गावातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलीच्या नावानेसुद्धा दोन हजार रुपये भरले जातील. शनिवार, १७ फेब्रुवारीला सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांनी ग्रामसेवक, इतर सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची घोषणा केली.गाव हगणदारीमुक्त, शिक्षणाला प्राधान्यवर्षभरापूर्वी थेट निवडून आलेले सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन कार्य सुरू केले. गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था सुधारली व स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सहभागी होऊन संपूर्ण गावाचे स्वरूप पालटले. यानंतर हगणदरीमुक्तीकडे गावाचा मोर्चा वळला. गाव पूर्णपणे हगणदारीमुक्त होऊन गोदरीच्या ठिकाणी संत गाडगेबाबा स्मारक उद्यान तयार करण्यात आले आहे. आणि घाणीचा येथे लवलेशही राहिलेला नाही.स्त्रीजन्म नितांत गरज आज स्त्री-पुरुष सामाजिक असमतोल बघता, भविष्यातील चित्र भयावह आहे. समानतेसाठी आपला कुठे तरी हातभार लागावा, या दृष्टिकोणातून या उपक्रमाचे पाऊल उचलले आहे.- पुरुषोत्तम घोगरे,सरपंच, खिरगव्हाण