शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन विभागाची तंबी, चार हजार विहिरींना अखेरची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 17:15 IST

विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण सहा जिल्ह्यांमधील शेतक-यांसाठी असलेल्या धडक सिंचन योजनेतील तब्बल ४ हजार २७५ विहिरींची कामे रखडली आहेत.

गजानन मोहोड

अमरावती : विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण सहा जिल्ह्यांमधील शेतक-यांसाठी असलेल्या धडक सिंचन योजनेतील तब्बल ४ हजार २७५ विहिरींची कामे रखडली आहेत. यासाठी शासनाने अखेरची संधी दिली असून, या विहिरींची कामे ३० जून २०१८ पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. यासाठी संबंधित जिल्हाधिका-यांद्वारा विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत व विदर्भात शेतकरी आत्महत्याप्रवण असलेल्या सहा जिल्ह्यांसाठी धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम २००६ ते २००९ या कालावधीत हाती घेतला. विदर्भात ८३ हजार २०१ विहिरींचे लक्ष्यांक देण्यात आले. यापैकी ६३ हजार ९६२ विहिरींना मंजुरी मिळाली. आतापर्यंत ४४ हजार १३६ विहिरींचीच कामे पूर्ण होऊ शकली. यामध्ये अमरावती विभागातील ३८ हजार ९४२ व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ५ हजार १९७ विहिरींचा समावेश आहे. अद्याप या सहा जिल्ह्यांतील २ हजार ८८३ विहिरींची कामे अर्धवट स्थितीत आहे, तर ४ हजार २७५ विहिरींची कामे सुरूच झाली नसल्याने नियोजन विभागाने ३० जून २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट केले होते. आता नोव्हेंबर २०१७ च्या परिपत्रकान्वये या सर्व विहिरींची कामे ३० जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची अखेरची संधी दिली आहे.नरेगातून धडक सिंचन योजनेत परत घेण्यात आलेल्या विहिरी तसेच यापूर्वी रद्द झालेल्या, परंतु पुन्हा सुरू करण्यात येणाºया विहिरींसाठी सर्व जिल्हाधिकाºयांद्वारा आता स्पेशल ड्राइव्ह करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्या लाभार्थ्यांना विहिरींची कामे करावयाची नाहीत, त्यांच्याकडून लेखी घेऊन किंवा पंचनामा करून रद्द करण्यात याव्यात व यानंतर भविष्यात अशा स्वरूपाच्या कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे नियोजन विभागाने निक्षून बजावले आहे.धडकमध्ये ६,५१८ विहिरींची कामे पुनरुज्जीवितविदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये धडक सिंचन योजनेतील १५,४३० विहिरी रद्द करण्यात आल्यात. मात्र, यापैकी १०,५२१ विहिरींना शासनाने पुन्हा मंजुरी दिली. पडताळणीअंती ६,५१८ विहिरी पुनरुज्जीवित करण्यात आल्यात. यापैकी सद्यस्थितित २,६५३ विहिरींची कामे पूर्ण झाली, तर अद्यापही ३,८१५ विहिरींची कामे रखडली आहेत. यापैकी १,०३४ विहिरींची कामे आता प्रगतिपथावर आहेत. या योजनेंतर्गत ५२० कोटी ८१ लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. यापैकी ३९४ कोटी खर्च झालेत. अजून १२६ कोटी ८० लाखांचा निधी शिल्लक असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.