शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या कलाकुसरीवर कोरोनाचा पालथा घडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसायसुद्धा यातून सुटलेला नाही. रोज कष्ट करून घाम गाळणाºया कुंभार बांधवांचा व्यवसाय टाळेबंदीच्या काळात पूर्णपणे ठप्प आहे. मार्चाासून जूनमहिन्यापर्यंत माठ, सुराई, घागर ही थंड पाण्याची भांडी विकली जातात.

ठळक मुद्देसंडे अँकर । कुंभारांच्या व्यवसायाला फटका; संचारबंदीच्या काळात ग्राहकांपर्यंत पोहोचली नाही भांडी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : यावर्षी कोरोनाच्या सावटात संचारबंदी करण्यात आल्याने उन्हाळ्यातही कुंभाराचा व्यवसाय थंडावला होता. आता सणासुदीच्या काळात देवाची मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांवर कोरोनाने उपासमारीची वेळ आणली आहे. यामुळे यावर्षी कोरोनाचे सावट सर्वांसाठीच कर्दनकाळ ठरत आहे.कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसायसुद्धा यातून सुटलेला नाही. रोज कष्ट करून घाम गाळणाºया कुंभार बांधवांचा व्यवसाय टाळेबंदीच्या काळात पूर्णपणे ठप्प आहे. मार्चाासून जूनमहिन्यापर्यंत माठ, सुराई, घागर ही थंड पाण्याची भांडी विकली जातात. त्याच काळात लग्नसराई असते. यामुळे वैवाहिक कार्यक्रमासाठी कुंभार समाजाकडून खास मातीची भांडी तयार करून घेतली जातात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या सावटात लॉकडाऊनच्या काळात हा धंदा पूर्णपणे बुडाला आहे. मातीचे तयार माठ विकले न गेल्यामुळे कुंभार बांधवांचा हजारो रुपयांचा माल पडून आहे. वर्षभर या नाजूक वस्तू सांभाळून ठेवणे जोखमीचे काम आहे.आता कुंभाराची उरलीसुरली भिस्त गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळीवर अवलंबून आहे. परंतु यातही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरुपात साजरा होणाºया या उत्सवांवरही नियंत्रण येणार आहेत. त्यामुळे ही मंडळी घरगुती प्रतिष्ठानेसाठी तयार होणाºया मूर्ती घडविण्याच्या तयारीला लागली आहेत. पोळा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपले आहेत. निदान या काळात तरी आतापर्यंत झालेले नुकसान भरून निघेल, अशी भावनिक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. घरगुती गणेशमूर्ती, श्रीकृष्ण, गोपिका यांच्या मूर्ती बनविन्यात कुंभार समाजबांधव सध्या व्यस्त झाले आहेत. टाळेबंदीमुळे चार फुटांच्या वर मूर्ती बसविण्यास गणेशोत्सव मंडळांना मनाई आहे. त्यामुळे शहरातील मोठे मूर्तिकारसुद्धा घरगुती लहान मूर्ती तयार करण्यात सारी मरगळ, निराशा झटकून कामाला लागले आहे.केव्हा थांबणार ही होरपळ?ओल्या मातीला हाताने आकार देऊन कुंभार नानाविध भांडी तयार करतो. त्याच हाताने मातीतून देवाच्या सर्वांगसुंदर मूर्तीदेखील घडविल्या जातात. या पारंपरिक व्यवसायावरच शेकडो कुटुंबांच्या घरातील दोन वेळची चूल पेटते. परंतु यंदा कोरोना संसर्गामुळे हा व्यवसाय डबघाईस आला आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेली ही होरपळ अद्यापही संपलेली नाही.कोरोना संक्रमणामुळे आमच्या व्यवसायाला अवकळा आली. सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली. त्यामुळे सार्वजनिक मंडळांकडून ‘श्रीं’च्या मुर्तीच्या आगाऊ मागणीत प्रचंड घट झाली आहे. तीन महिन्यांपासून आमच्या हाताला काम नाही. आता मुर्त्या बनविणे सुरू असले तरी मागणी नाही.- गजानन रोतळे,मुर्तीकार, शिरजगाव बंड.