शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर घरात रोखले पिस्टल; सोने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 05:00 IST

पोलीस सूत्रांनुसार, प्रदीप मातने (४५, रा. माधवनगर) व शुभांगी प्रदीप मातने (४०) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. शुभांगी मातने या शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास बाहेरून घरी परतल्या. त्यांच्या पाठोपाठ दोन अज्ञातांनी घरात प्रवेश केला.

ठळक मुद्देमाधवनगरातील घटना, पती-पत्नीवर चाकूचा वार, पोलीस आयुक्तांची घटनास्थळाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भरवस्तीतील घरात सायंकाळी साडेआठ वाजता महिलेच्या कानशिलावर पिस्टल रोखून साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले. या घटनेत पती व पत्नी यांना चाकूने जखमी करण्यात आले. ही धक्कादायक घटना हिंदू स्मशानभूमीनजीक माधवनगरात शनिवारी घडली.पोलीस सूत्रांनुसार, प्रदीप मातने (४५, रा. माधवनगर) व शुभांगी प्रदीप मातने (४०) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. शुभांगी मातने या शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास बाहेरून घरी परतल्या. त्यांच्या पाठोपाठ दोन अज्ञातांनी घरात प्रवेश केला. ऑटोमॅटिक लॉक असलेले दार बंद केल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने चाकू काढून त्यांच्या मानेवर लावला आणि मंगळसूत्र व अंगठी हिसकली. त्याला विरोध करीत शुभांगी मातने यांनी दाराकडे धाव घेतली. या झटापटीत चोरट्याकडील चाकूचा वार हाताला लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न करताच दुसऱ्याने पिस्टल रोखून त्यांना शांत राहण्यास आणि घरातील पैसे व सोन्याचे दागिने देण्यास फर्मावले. दोघांनी त्यांचे ओढणीने हात बांधून एका खोलीत डांबून ठेवले. चोरट्यांनी यानंतर बेडरूमच्या कपाटातील साहित्याची फेकफाक करून ३ लाख ९२ हजाराचे सोन्याचे दागिने व चार हजार नगदी असा ३ लाख ९६ हजाराचा ऐवज मिळविला. १५ ते २० मिनटे हा थरार सुरू असताना शुभांगी यांचे सराफा व्यवसायिक असलेले पती प्रदीप मातने हे घरी आले. मुख्य दरवाजा त्यांनी दुसऱ्या चावीने उघडला. बेडरूममध्ये चोरी होत असल्याचे पाहताच त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी त्यांच्यावर चाकुहल्ला केला व पिस्टल रोखली. यादरम्यान वरच्या माळ्यावर राहणारे त्यांचे बंधू आशिष खाली आले. त्यांची चाहूल लागताच चोरट्यांनी पळ काढला.प्रदीप मातने यांनी जखमी अवस्थेतच काही अंतरापर्यंत चोरट्यांचा पाठलाग केला. चोरट्यांनी काही अंतरानंतर एका दुचाकीचालकाला खाली पाडले. डोक्यावर चाकूची मूठ मारून जखमी केले व दुचाकी घेऊन पळ काढला. यामध्ये दुचाकीचालक नंदू वामनराव कुटे (४२, रा. शिक्षक कॉलनी) हे जखमी झाले. यानंतर नागरिकांनी तिघांनाही उपचाराकरिता खासगी रुग्णालयात नेले.पोलीस आयुक्त आरती सिंह, उपआयुक्त शशिकांत सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी, एपीआय गजानन मेहेत्रे , सहायक पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.दुचाकी तीन किमीवर मिळालीआरोपींची विना क्रमांकाची दुचाकी घटनास्थळावर पोलिसांना आढळली, तर नंदू कुटे यांची पळविलेली दुचाकी (एमएच २७ बीडी ६५३८) तीन किमी अंतरावर टाकून चोरट्यांनी पळ काढला.आरोपीच्या शोधार्थ चार पथके रवानाआरोपीच्या शोधार्थ राजापेठ व शहर गुन्हे शाखेचे चार पथके रवाना करण्यात आली आहेत. अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणार, असे सीपी आरती सिंह यांनी सांगितले.आरोपींकडून परिसरात गोळीबारआरोपींनी मातने यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर माधवनगरातील परिसरात गोळीबार केल्याचे शुभांगी मातने यांनी ह्यलोकमतला सांगितले. आरोपींनी पळ काढल्यावर लोकांनी आम्हाला दवाखान्यात नेल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Thiefचोर