शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

निपाहचा धसका; डुकरांचे रक्तजल नमुने तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 19:12 IST

टवाघळांचे वास्तव्य असलेले विस्तीर्ण बंगले किंवा वड, पिंपळ आदी वृक्षांवर आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे.

अमरावती : केरळनंतर गोव्यात धुमाकूळ घालणाऱ्या निपाह या जीवघेण्या संसर्गजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने राज्यातील वराहांचे रक्तजल नमुने (सिरम) तपासण्याची मोहीम सुरू केली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे  जिल्हास्तरावरील पशुसंवर्धन अधिकाºयांशी संवाद साधून वराहांचे रक्त जल नमुने पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.  निपाह या जीवघेण्या आजाराचा संसर्ग वटवाघळाने खाल्लेली फळे किंवा उष्टे पदार्थ अन्य पशूंच्या खाण्यात येत असल्यास मनुष्यास होण्याचा धोका असल्याचा निष्कर्ष आरोग्य यंत्रणेने काढला आहे. परिणामी वटवाघळांचे वास्तव्य असलेले विस्तीर्ण बंगले किंवा वड, पिंपळ आदी वृक्षांवर आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. गाव, शहरातील अशा परिसरात गावठी वराहांचा मुक्त संचार असल्यामुळे पशुसंवर्धन आयुक्तांनी सतर्कता बाळगण्यासाठी रक्तजल नमुने (सिरम) तपासण्याचे निर्देश दिले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रायोगिक तत्त्वावर ५० वराहांचे रक्तजल नमुने गोळा करून ते तपासणीसाठी पाठविण्याचे फर्मान बजावले आहे. आता जिल्हास्तरावर वराहांचे रक्तजल नमुने गोळा करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने युद्धस्तरावर तयारी सुरू झाली आहे. प्रयोगशाळेतून वराहांच्या रक्तजल नमुन्यांचे अहवाल प्राप्त होताच, राज्याच्या कोणत्या भागात निपाह घर करून बसला आहे का, हे स्पष्ट होईल. 

अ‍ॅक्शन प्लॅन तयारकेरळ, गोव्याप्रमाणे निपाहबाबत राज्यात आणीबाणी उद्भवू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्यासह प्रमुख अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. या आजाराबाबत कुणीही गाफील असता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना आदेशित केले आहे. हा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी आरोग्य, पशुसंवर्धन विभागाकडे अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

वटवाघळांच्या स्थळाची हायफो केमिकलने फवारणी वटवाघळांच्या वास्तव्याचा परिसर, स्थळांवर हायफो केमिकलने फवारणी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने पशुसंवर्धन विभाग कामास लागला आहे. विशेषत: वटवाघळांचे मूत्र, विष्ठेवर लक्ष ठेवले जाणार असून, वास्तव्याचा परिसर फवारणी करून संपूर्ण निर्जंतुक केला जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडे मनुष्यबळाचा वानवा असल्याने फवारणीसाठी कंत्राटी कर्मचारी नेमण्याची मुभा शासनाने दिली आहे. 

‘‘ दोन दिवसांपूर्वी पशुसंर्वधन आयुक्तांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निपाह रोखण्यासाठी वराहांचे रक्तजल नमुने पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार रक्तजल नमुने गोळा करण्यासाठी कर्मचाºयांची बैठक घेतली आहे. लवकरच वराहांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले जातील.- राजेंद्र पेठे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, अमरावती

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूHealthआरोग्य