शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘फार्मसी’ विद्यार्थ्यांचा ‘प्रहार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 22:46 IST

फार्मसी अभ्यासक्रमाचे अवाजवी शैक्षणिक शुल्क कमी करण्यासह परीक्षेचा निकाल, अचूक प्रश्नपत्रिका, निकालात गोंधळ आदी प्रश्न निकाली काढण्यासाठी ....

ठळक मुद्देअवाजवी शुल्कप्रकरणी आंदोलन : विद्यापीठात कुलगुरू, कुलसचिवांची घेतली भेट

आॅनलाईन लोकमतअमरावती : फार्मसी अभ्यासक्रमाचे अवाजवी शैक्षणिक शुल्क कमी करण्यासह परीक्षेचा निकाल, अचूक प्रश्नपत्रिका, निकालात गोंधळ आदी प्रश्न निकाली काढण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावतीे विद्यापीठावर प्रहार विद्यार्थी संघटनतर्फे सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कुलगुरू, कुलसचिवांशी चर्चा करून मागणीचे निवेदन सादर केले.प्रहार संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष अक्षय राऊत यांच्या नेतृत्वात असंख्य विद्यार्थ्यांनी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख आदींची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांच्या पुढ्यात मांडले. दरम्यान, कुलगुरू चांदेकर यांनी फार्मसी अभ्यासक्रमाचे शुल्क कमी करण्याचा अधिकार हा विद्यापीठाला नसून यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल, असा शब्द विद्यार्थ्यांना दिला. त्याकरिता दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागेल, असेही कुलगुरूंनी सांगितले. नियमित परीक्षा शुल्क कमी करणे, ४५ दिवसांच्या आत निकाल लावणे, बॅकलॉग परीक्षेचा निकाल २० दिवसांत जाहीर करणे, पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २० दिवसांच्या आत शुल्क परत मिळावे, प्रश्नपत्रिका अचूक आणि योग्य असाव्यात, विद्यार्थ्यांचे मनोबल खचू नये, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी मांडल्या.विद्यापीठात कामानिमित्त येणाºया विद्यार्थ्यांचे निवास, जेवणाची व्यवस्था करणे, आॅनलाईन निकालाअंती प्रश्नपत्रिका वेळीच मिळाव्यात, उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन योग्य पद्धतीने व्हावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. कुलगुरूंशी चर्चा करतेवेळी अक्षय राऊत, अमोल वाघमारे, ईश्वर राऊत, अतूल वाघमारे, शुभम वाघमारे, शुभम वारणकर, दीपक ढाबे उपस्थित होते.