शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

‘पीएफ, इसएसआयसी’ची कपात ‘अमृत’च्या खिशात

By admin | Updated: January 2, 2017 01:01 IST

सुरक्षा रक्षकांच्या मानधनातून कपात केलेली पीएफ आणि इएसआयसी’ची रक्कम ‘अमृत’ने स्वत:च्या खिशात ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

केवळ ५.३२ लाखांचा भरणा : महापालिकेत सावळागोंधळ प्रदीप भाकरे  अमरावती सुरक्षा रक्षकांच्या मानधनातून कपात केलेली पीएफ आणि इएसआयसी’ची रक्कम ‘अमृत’ने स्वत:च्या खिशात ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. पीएफच्या नावे २४ लाख, तर इएसआयसीच्या नावे ५.४२ लाख रुपयांच्या रकमेवर 'अमृत'ने डल्ला मारला आहे. ही आकडेवारी केवळ फेब्रुवारी ते आॅगस्ट २०१६ दरम्यानचीच आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरची रक्कम यात जोडल्यास अमृतने या संपूर्ण व्यवहारात महापालिका आणि सुरक्षा रक्षकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. अमृतने फेब्रुवारीमध्ये १५० सुरक्षा रक्षकांची १ लाख ३० हजार ७७७, मार्च २०१६ मध्ये १५७ सुरक्षा रक्षकांची १,३०,७७७ इतकी रक्कम पीएफमध्ये भरणा केली. एप्रिल, मे, जून आणि जुलै या चार महिन्यांत ही रक्कम मानधनातून कपात करण्यात आली. मात्र खात्यात भरण्यात आली नाही. अहवालानुसार ९६ लाख ०७ हजार ३२६ रुपयांच्या एकूण अदा केलेल्या देयकाच्या तुलनेत अमृतने प्रतिसुरक्षा रक्षक २५.६१ टक्के इपीएफ भरणे अनिवार्य होते. प्रत्यक्षात २४ लाख ६० हजारांऐवजी केवळ तीन महिन्यांमध्ये ४.५० लाख भरणा करण्यात आला. करारनाम्यानुसार इपीएफची कपात २५.६१ टक्के असेल तर फेब्रुवारी, मार्च आणि आॅगस्टमध्ये ती रक्कम, सरासरी ९ ते १० टक्केच भरण्यात आली आहे. मानधनातून मात्र ही कपात न चुकता करण्यात आली. याशिवाय फेब्रुवारी ते आॅगस्टदरम्यान ९६.०७ लाखांचा तुलनेत ६.२४ लाख भरणे अनिवार्य असताना केवळ ८२०६७ रुपयेच भरण्यात आले आहेत. ईपीएफसह इएसआयसी, आयकर आणि सेवाकरामध्ये आर्थिक सावळागोंधळ निर्माण झाला आहे. अमृतकडून भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेचे इमले रचले जात असताना महापालिका प्रशासनाचे मौन संतापजनक आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहे. या अनियमितेची चौकशी अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविण्यात आली असून चौकशी अहवालाकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुरक्षा रक्षकांच्या संख्येत तफावत महापालिकेला १५४ सुरक्षा रषक पुरविण्याचा कंत्राट ‘अमृत’ला देण्यात आला. मात्र प्रत्येक महिन्यात सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ तथा घट दाखविण्यात आली आहे. उपस्थित अहवाल न दाखवता फेब्रुवारीत १५०, मार्चमध्ये १५७, एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येक १४७, जूनमध्ये १५२, जुलैत १७० तर आॅगस्टमध्ये तब्बल १७८ सुरक्षा रक्षक दाखविण्यात आले. अर्थात फेब्रुवारी ते आॅगस्ट या कालावधीत २८ सुरक्षा रक्षक वाढविण्याची गरज पालिकेला का पडली, याचे उत्तर प्रशासनाजवळ नाही. टक्केवारीचा हिशेब उपलब्ध नोंदीनुसार फेब्रुवारी ते आॅगस्ट या कालावधीत सुरक्षा रक्षकांची संख्या कमी - अधिक राहिली. १५४ सुरक्षा रक्षकांचा करारनामा असताना उर्वरित २४ सुरक्षारक्षक कुठे लावलेत, याचे उत्तर प्रशासनातर्फे येणे गरजेचे आहे. १५० प्रमाणेच १७८ सुरक्षा रक्षक कुठे कार्यरत आहेत याचा उपस्थिती अहवाल देण्यात आलेला नाही, टक्केवारीच्या हिशेबामुळे हा सर्व गोरखधंदा घडवून आणला गेला.