शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

जिल्ह्यात पेट्रोलपंपांवर ‘लिटमस’ पेपरच नाहीत

By admin | Updated: June 10, 2015 00:12 IST

पेट्रोल व डिझेलमधील भेसळ ओळखण्यासाठी ग्राहकांना ‘लिटमस’ पेपर उपलब्ध करून देणे पेट्रोलपंपधारकांना बंधनकारक

भोंगळ कारभार : ग्राहक हक्क कायद्याची पेट्रोलपंपधारकांकडून अंमलबजावणी नाहीसुरेश सवळे अमरावतीपेट्रोल व डिझेलमधील भेसळ ओळखण्यासाठी ग्राहकांना ‘लिटमस’ पेपर उपलब्ध करून देणे पेट्रोलपंपधारकांना बंधनकारक असताना या बाबीचे पालन बहुतांश पेट्रोलपंपांवर होताना दिसत नाही. त्यामुळे आपण नेमके कोणते पेट्रोल, डिझेल घेतो याबाबत ग्राहक अनभिज्ञ राहतो. हे वास्तव आहे. पेट्रोलपंपावर मिळणाऱ्या पेट्रोल व डिझेलमध्ये भेसळ आहे काय, हे तपासण्याचा ग्राहकांना ग्राहक कायद्यानुसार हक्क आहे. ग्राहकास अगदी थोडा जरी संशय आल्यास ‘लिटमस’ पेपरद्वारे नियमानुसार पेट्रोलची तपासणी करता येते. परंतु या सुविधेची माहिती पेट्रोल ग्राहकांना नाही. नियमानुसार पेट्रोलपंपांवर ‘लिटमस’ पेपर ठेवण्यात येत नाही. परिणामी ग्राहकांच्या हक्काची पायमल्ली राजरोसपणे होत आहे. याकडे पेट्रोलियम विभाग व ग्राहक संघटना दुर्लक्ष करीत असून पंपावर मिळणाऱ्या पेट्रोलमध्ये भेसळ असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. अशा प्रकारच्या भेसळविरूद्ध सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. एवढेच नव्हे, तर येथे सूचना फलक, शिल्लक साठा, भाव फलक, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, फ्री एअर चेकींग आदी सुविधाही पुरविणे बंधनकारक आहे. यातील काही सुविधा पुरविली जात असली तरी ‘लिटमस’ पेपरची सुविधा मात्र अजूनही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. यासंबंधी अनेक वाहनचालकांशी संपर्क साधला असता त्यांना ‘लिटमस’ पेपरबाबत काहीही माहिती नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. आज जिल्ह्यात हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडिया आॅईल व इतर कंपन्यांद्वारे हजारो लिटर पेट्रोल विकले जात आहे. परंतु अधिकार असूनही ग्राहकांना मात्र पेट्रोलची सुविधा तपासता येत नाही. ही पेट्रोल ग्राहकांची शोकांतिका आहे. (प्रतिनिधी)पेट्रोल सुविधेविषयी नियमग्राहक पेट्रोलियम विभागाच्या नियमानुसार पेट्रोलपंपधारकास ‘लिटमस’ पेपरची मागणी करू शकतो. त्याद्वारे पेट्रोलमधील भेसळ तपासता येते. तसेच पेट्रोल पंपावर ‘लिटमस’ पेपर उपलब्ध करून न दिल्यास पहिल्या पाहणीत १० हजार रूपये, दुसऱ्या वेळी २५ हजार तर तिसऱ्या वेळेस एक लाखांचा दंड तसेच परवाना निलंबनाचीसुद्धा कारवाई होऊ शकते.अशी ओळखावी लागते भेसळपेट्रोलमधील भेसळ ओळखण्यासाठी पांढऱ्या ‘लिटमस’ पेपरचा उपयोग होतो. या पेपरवर पेट्रोलचे दोन थेंब टाकल्यास तो निळा झाल्यास हे पेट्रोल भेसळयुक्त असल्याचे समजते. ‘लिटमस’ पेपरचा रंग न बदलल्यास पेट्रोलमध्ये भेसळ नसल्याचे प्रमाणित होते.