शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

टक्केवारीची बजबजपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:05 IST

महापालिका आयुक्तांचा ‘पीए’ धरला गेल्याने महापालिकेतील ‘टक्केवारी’ची बजबजपुरी उघड झाली आहे. लोक तक्रारीसाठी पुढे येवू लागले आहेत.

ठळक मुद्देएसीबीचे लक्ष : झोन कार्यालयेही परिघात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका आयुक्तांचा ‘पीए’ धरला गेल्याने महापालिकेतील ‘टक्केवारी’ची बजबजपुरी उघड झाली आहे. लोक तक्रारीसाठी पुढे येवू लागले आहेत. त्या अनुषंगाने बांधकाम आणि एडीटीपीमधील ‘टक्केवारी’ रडारवर आली आहे. एसीबीकडील तक्रारी गोपनीय असल्याने तेथून दुजोरा मिळाला नसला तरी ‘दुखावलेले आत्मे’ तक्रारीसाठी पुढे सरसावल्याची माहिती हाती आली आहे.महापालिकेतील बांधकाम आणि नगर रचना विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार वजा टक्केवारी चालते, हे सर्वश्रुत आहे. विकास नियंत्रण नियमावलीला फाटा देऊन अनधिकृत कामे अधिकृत केली जातात. टीडीआर कसे मिळविले जातात, हायराइज बिल्डिंगला परवानगी कशी मिळते, आॅटोडीसीआरमधून बांधकाम परवानगी व नकाशे ओके झाल्यानंतरही ती फाइल कशासाठी अडविली जाते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सर्वसामान्यांना त्यांच्या हजार-बाराशे फूट बांधकामाच्या परवानगीसाठी सहा महिने चकरा माराव्या लागतात, तर दुसरीकडे लब्धप्रतिष्ठितांना व मोठी ‘टक्केवारी’ मोजणाऱ्यांना एका दिवसात आवश्यक मंजुरी दिली जाते. एडीटीपीत सर्वाधिक व्यवहार केले जातात. त्यातील अनधिकृत कामे ‘अधिकृत’ चौकटीत बसविण्यासाठी ‘टक्केवारी’ चालते. बडी बिदागी खिशात गेली, की ‘डीपी’तील आरक्षण कसे बदलविले जाते. न्यायालयीन पर्याय उपलब्ध असताना प्रशासन बॅकफूटवर येते, यावरून एडीटीपीतील बजबजपुरी उघड होणारी आहे.येथेही चालतो व्यवहारबाजार परवाना, स्वच्छता, भांडार, सामान्य प्रशासन विभाग, कार्यकारी अभियंता-२, पाणीपुरवठा, झोन कार्यालये, शौचालय योजना, घरकुल योजना राबविणारे विभाग आणि सोबतच कर विभागात मोठ्या प्रमाणात व्यवहार चालत असल्याची ओरड आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागही त्याला अपवाद नसल्याचे तेथीलच कर्मचारी सांगतात.आयुक्तांनी घालावे लक्षदस्तुरखुद्द स्वत:चा पीए एसीबीकडून धरला गेल्याने त्याचे शिंतोडे आयुक्तांवर उडाले आहेत. त्यामुळे प्रशासनाची बिघडलेली प्रतिमा ताळ्यावर आणण्याचे मोठे आव्हान आयुक्तांसमोर असेल. कर विभागातील काही लाचखोरांना एसीबीकडून पकडून देण्याचा गर्भीत इशारा आयुक्तांनी दिला होता. त्यामुळे प्रशासकीय कार्यालयासह आयुक्तांनी स्वत:च जे निरीक्षण नोंदविले होते, त्यावर अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.