शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव शहरवासीयांना कधी कळणार पाण्याची किंमत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:22 IST

पाणी भरल्यानंतर नळ सुरू ठेवणे, दररोज घरातील पाणी शिळे झाले म्हणून ते फेकून नव्याने भरणे, आंघोळीसाठी भरमसाठ पाणी वापरले जाणे, यावरून शहरवासीयांना पाण्याची किंमत कळणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देदररोज दोन लाख लिटर पाण्याचा अपव्यय । दोन दिवसाआड मिळणार पाणी

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पाणी भरल्यानंतर नळ सुरू ठेवणे, दररोज घरातील पाणी शिळे झाले म्हणून ते फेकून नव्याने भरणे, आंघोळीसाठी भरमसाठ पाणी वापरले जाणे, यावरून शहरवासीयांना पाण्याची किंमत कळणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बगाजी सागर प्रकल्पात अल्प पाणीसाठा असल्याने शहरवासीयांना आगामी काळात दोन दिवसाआड पाणी मिळणार आहे.सुमारे २५ हजार लोकसंख्येच्या शहरात बाराशे कुटुंब भाड्याने राहतात. तूर्तास शहरवासीयांसाठी ८५ व्हॉल्व्हमधून दिवसाआड पाणी सोडले जाते. ज्या बगाजी सागर धरणातून शहराला पाणी मिळते. त्या धरणात अल्प पाणीसाठा असल्याने आगामी काळात दोन दिवसाआड पाणी सोडले जाणार आहे. शहरवासीयांना दरडोई ७५ लिटर पाणी मिळत असले तरी या पाण्याचा वापर योग्य पद्धतीने शहरात होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. सध्या उन्हाचा पारा ४५ अंशावर पोहोचल्याने कूलरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात आहे.कपडे धुवायला अधिक पाणीएखादी वस्तू मुबलक मिळाली की, त्या वस्तूची किंमत कळत नाही. पाण्याचेही तसेच. कपडे धुण्यासाठी अधिक पाणी वापरले जाते. दररोज शॉवरखाली आंघोळ करणाऱ्यांची संख्या कमी नाही. बकेटीत पाणी घेऊन आंघोळ केली, तर १८ लिटर पाणी लागते. शॉवरखाली आंघोळ केल्यास १०० लिटर पाणी लागते. वाहत्या नळाखाली हात धुणे, शौचानंतर फ्लशचा वापर अशा सवयी लागल्या असल्याने आगामी काळात धामणगाव शहराला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.बगाजी सागरात पाणी कमी प्रमाणातबगाजी सागर धरणात अल्प पाणीसाठा आहे.पावसाळयास सुरुवात होईपर्यंत प्रत्येक नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी सांघिक प्रयत्न करावेत, असे आवाहन धामणगाव रेल्वेचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी केले.उन्हाळ्यात धामणगाव शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, बगाजी सागर धरणातून शहराला कमी पाणीपुरवठा होतो. आगामी काळात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर जपून करावा.- सुमेध अलोनेमुख्याधिकारी, धामणगाव रेल्वे

टॅग्स :Waterपाणी