शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

दंड, जप्ती अन् लिलावही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:33 IST

आर्थिक वर्ष संपायला उणेपुरे चार महिने शिल्लक असताना मालमत्ता कराची वसुली १४.८२ कोटींवर स्थिरावल्याने प्रशासन घामाघूम झाले आहे.

ठळक मुद्देकरवसुली माघारली : चार महिन्यांत ३२ कोटी वसुलीचे 'टार्गेट'

प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आर्थिक वर्ष संपायला उणेपुरे चार महिने शिल्लक असताना मालमत्ता कराची वसुली १४.८२ कोटींवर स्थिरावल्याने प्रशासन घामाघूम झाले आहे. ४७ कोटींच्या मागणीच्या तुलनेत वसुलीचा टक्का माघारल्याने आगामी काळात कारवाईचा दंडुका उगारण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. आतापर्यंत केवळ ३१ टक्के करवसुली झाली आहे.गतवर्षी एमआयडीसीच्या काही मालमत्तांसह अन्य मालमत्ताधारकांवर दंड, जप्ती, लिलावाची कारवाई करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमिवर यंदाही जानेवारीनंतर थकीत मालमत्ता धारकांवर बडगा उगारला जाईल. गतवर्षीप्रमाणे यंदाही थकीत मालमत्ता धारकांच्या घरासमोर ‘डफळे’ वाजविण्याचे संकेत प्रशासनाने दिले असले तरी अशी नामुष्कीची वेळ आढवून न घेता थकबाकीदारांनी त्यांच्याकडील कराचा भरणा त्वरित करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. पाचही प्रशासकीय झोनमधील बड्या थकीत मालमत्ताधारकांची यादी बनविली असून त्यांना ‘डिमांड नोटीस’ पाठविल्या जात आहे. सहायक आयुक्त स्वत: हा मोर्चा सांभाळत आहेत. मात्र तूर्तास आठ महिन्यांत केवळ १४.८२ कोटी रूपये वसूल झाले आहे.आठ लाख लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करणाºया अमरावती महापालिकेचा डोलारा मालमत्ता करावर अवलंबून आहे. महापालिकेचे स्वउत्पन्न वाढविण्यासाठी नगरविकास विभागानेही या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना शंभर टक्के करवसुलीचे उद्दिष्टे दिले. तथापि प्रत्येक वर्षी ७० ते ७५ टक्के करवसुली होत असल्याने विकासकामे आणि आस्थापना खर्चात अडसर निर्माण झाला आहे. मालमत्ता करातून येणाºया अल्प उत्पन्नाने महापालिका परावलंबित्वाचे जीने जगत आहे. त्या पार्श्वभूमिवर वसुलीच्या तुलनेत निधी देण्याचे धोरण राज्य सरकारने अंगिकारल्याने तर पालिकेला शंभर टक्के वसुली शिवाय पर्यायच उपलब्ध नाही.महापालिका क्षेत्रातील सुमारे दीड लाख मालमत्तांमधून जुनी थकबाकी व नवी मिळून मालमत्ता कराची एकूण मागणी ४७.२२ कोटी रूपये आहे. त्या तुलनेत २३ नोव्हेंबरपर्यंत १४,८२,२५,३६७ रूपये वसुली झाली आहे. उर्वरित ६९ ते ७० टक्के वसुली करण्यासाठी पालिकेजवळ केवळ चार महिने आहेत. त्या पार्श्वभूमिवर आवाहन आणि वारंवार दिलेल्या नोटिसींना न जुमानणाºया मालमत्ताधारकांविरूद्ध दंड, जप्ती आणि प्रसंगी लिलावाची कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहे.