शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

पवार म्हणाले, ती कारवाई मंडलिकांची

By admin | Updated: July 9, 2016 00:02 IST

दस्तुरनगर परिसरात गुरुवारी झालेली अतिक्रमणाची कारवाई महापालिकेची नसून ती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी ...

अमरावती : दस्तुरनगर परिसरात गुरुवारी झालेली अतिक्रमणाची कारवाई महापालिकेची नसून ती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केल्याचे महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. आम्ही केवळ त्या कारवाईला सहकार्य केले, अशी भूमिका पवारांनी फेरीवाल्यांच्या निवेदनावर उत्तर देताना घेतली. युवा स्वाभिमानच्या नेतृत्वात शंभरांवर फेरीवाल्यांनी शुक्रवारी आयुक्तांचे दालन गाठले. आपण या संदर्भात पोलीस आयुक्तांशी बोलू. मात्र आपणही त्यांना भेटून आपली फिर्याद मांडा, अशी सूचना पवार यांनी युवा स्वाभिमानचे शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे यांना केली. यावेळी आयुक्तांनी दस्तुरनगरमधील भाजीमंडीची वस्तुस्थिती मनपा पदाधिकाऱ्यांकडून समजून घेतली व स्वत: थोड्याच वेळात दस्तुरनगरची पाहणी करु, असे आश्वासनही दिले. मागील दोन दिवसांपासून महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त सहकार्याने शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारी दस्तुरनगर चौकातील गौरक्षणलगत असलेल्या भाजीमंडीवर बुलडोझर चालविण्यात आला. याखेरीज अन्य अतिक्रमण भुईसपाट करण्यात आले. त्या विरोधात आयुक्तांकडे रोष व्यक्त करण्यात आला. अतिक्रमण पथक प्रमुखाविरुद्ध रोषअमरावती : या मोहिमेत ज्यांची दुकाने उध्वस्त करण्यात आली त्यांनी शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास महापालिका गाठली व थेट आयुक्तांनाच विचारणा केली. तत्कालिन पालकमंत्री विखे पाटील यांच्या आदेशाने दस्तुरनगर परिसरात शेतकऱ्यांना जागा देण्यात आली होती. मात्र अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी कुठलीही नोटीस आणि पूर्वसूचना न देता बुलडोझर चालविला, असा आरोप फेरीवाल्यांकडून करण्यात आला. आमच्या हातगाड्यांवर, खोक्यांवर बुलडोझर चालविल्याने आम्हांवर उपासमारीची वेळ येवून ठेपल्याचे सांगण्यात आले. युवा स्वाभिमानचे हिंगासपुरे, अभिजित देशमुख, अनुप अग्रवाल यांनी हा मुद्दा रेटून धरला. त्यावर आयुक्तांनी ‘स्पॉट व्हीजीट’ करण्याची ग्वाही दिली. तद्नंतर या फेरीवाल्यांनी आयुक्त कार्यालयासमोर सुमारे १ तास ठिय्या दिला. (प्रतिनिधी)मग कारवाई कुणाची?पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेवून शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी एक महिन्याची ‘डेडलाईन’ दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पोलीस आणि मनपाला संयुक्त कारवाईचे आदेश देत १५ दिवसाचाच अल्टीमेटम दिला. तत्पूर्वी आ. सुनील देशमुख यांनीही वाहतूक आणि अतिक्रमणासंदर्भात पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. वटहुकूम कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आली मात्र ज्या ठिकाणी विरोध केला जातो तेथे कारवाईची जबाबदारी परस्परांच्या अंगावर ढकलली जाते आहे. पाच दिवसात हॉकर्स झोन निश्चित करा : मागणीशहर अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश देवून पालकमंत्र्यांनी फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आणून ठेवल्याचा आरोप करत पाच दिवसाच्या आत हॉकर्स झोन निश्चित करावे, अशी मागणी युवा स्वाभिमानच्यावतीने करण्यात आली. यावेळी दस्तुरनगर भाजीमंडी, फळ विक्रेते व अन्य फेरीवाल्यांची लक्षणीय उपस्थिती होती.