लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येला तीन आठवडे उलटत असताना, त्यांच्या कुटुंबीयांची ससेहोलपट थांबलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही या प्रकरणाचा पोलीस तपास संथ गतीने सुरू आहे. नगरविकास आणि गृह ही दोन्ही खाती रणजित पाटील यांच्याकडे असल्यामुळे त्यांचेच अभय लाभल्याचे सूर आता महापालिकेतूनच उमटू लागले आहेत. एका मनुष्याच्या आयुष्याचे शासनाच्या लेखी काहीच मोल नाही काय, असा सवाल त्यामुळे उपस्थित झाला आहे.महापालिका आयुक्त हेमंत पवार आणि सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांनीच सुधीर गावंडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केले, अशी तक्रार गावंडेंंच्या पत्नीची आहे. सुरुवातीला तक्रार घेण्यासही नकार देणाºया राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी घेतलेली लेटलतिफीची भूमिका संशयास्पद आहे. गावंडे, बोंद्रे व पवार यांच्याबाबतची सर्व कागदपत्रे पोलिसांकडे असताना चौकशी सुरू आहे, हे पालुपद संशयास खतपाणी घालणारे ठरले आहे. एवढेच काय तर राज्याचे गृह व नगरविकास खाते सांभाळणारे रणजित पाटील यांनीही या प्रकरणात आयुक्त हेमंत पवार यांची बाजू घेतल्याचा आरोप लोक करू लागले आहेत. पवारांवर प्रेम करणाºया काही स्थानिकांच्या आग्रहाखातर ना. रणजित पाटील यांनी पवारांची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून दिली होती. अभयदानासाठी शब्दही टाकला होता, अशी चर्चा सतत होत आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेने चर्चेतील ‘त्या’ घडामोडीला बळच मिळते.अधिकाऱ्यांच्या जिवाचे मोल नाही का?गृहविभागाची जबाबदारी संवेदनशीलपणे हाताळणाºया रणजित पाटील यांना एका अधिकाºयाच्या जिवाचे जराही मोल नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पवार व बोंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, यासाठी सुधीर गावंडेंचे वृद्ध पिता, पत्नी, भाऊ ही मंडळी जंगजंग पछाडत असताना, पाटील यांनी पीडितांऐवजी संशयाची सुई असणाºयांच्या पाठीशी उभी केलेली शक्ती त्यांची संवेदनशील छबी प्रश्नांकित करू लागली आहे. नगरविकास खात्याचे राज्यमंत्री या नात्याने त्या खात्याकडून स्वतंत्र चौकशीचे आदेशही ते देऊ शकले असते.
पवार, बोंद्रेंना गृहराज्यमंत्र्यांचे अभय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:21 IST
महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येला तीन आठवडे उलटत असताना, त्यांच्या कुटुंबीयांची ससेहोलपट थांबलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही या प्रकरणाचा पोलीस तपास संथ गतीने सुरू आहे.
पवार, बोंद्रेंना गृहराज्यमंत्र्यांचे अभय ?
ठळक मुद्देमृत्यूनंतरही फरफट : सुधीर गावंडे आत्महत्याप्रकरण