शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील पोहरा जंगलातील पक्षिवैभवात दुर्मीळ पक्ष्यांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 10:45 IST

जंगल व जैवविविधतेने नटलेला समृद्ध असा अमरावती प्रदेश. जिल्ह्यात आकारमानाने मोठा असा मेळघाट व्याघ्र प्रकल्प, याशिवाय येथे महेंद्री राखीव जंगल सालबर्डी जंगल, काही गवताळ माळराने व पक्ष्यांची विविधता असलेले अनेक पाणवठे तेथे उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देवन्यप्रेमींमध्ये आनंदठिपकेवाला सर्पिका पक्षी प्रथमच आढळला

आॅनलाईन लोकमतअमरावती : जंगल व जैवविविधतेने नटलेला समृद्ध असा अमरावती प्रदेश. जिल्ह्यात आकारमानाने मोठा असा मेळघाट व्याघ्र प्रकल्प, याशिवाय येथे महेंद्री राखीव जंगल सालबर्डी जंगल, काही गवताळ माळराने व पक्ष्यांची विविधता असलेले अनेक पाणवठे तेथे उपलब्ध आहेत.याशिवाय अमरावती शहराला लागूनच पोहरा मालखेडचे संपन्न जंगल आहे. मेळघाटात आजवर २९५ प्रजातींच्या पक्ष्याची नोंद झालेली असून जवळपास ३३० प्रजातीच्या पक्ष्यांची पोहरा जंगलात व अमरावती परिसरात आजवर नोंद झालेली आहे. या वैभवात आणखी एका पक्ष्याची भर पडली असून, 'ठिपकेवाली सर्पिका' हा पक्षी नुकताच या जंगलात नव्याने वास्तव्यास आला आहे. शुभम गिरी व प्रतीक खंडारे या पक्षी अभ्यासकांना हा पक्षी पोहरा जंगलात मुक्त विहार करताना आढळून आला. पोहरा जंगलातील ही प्रथमच नोंद आहे.हा पक्षी मध्यप्रदेशाला लागून असलेल्या विदर्भ, सातपुडा पर्वतरांग, गुजराथ व छत्तीसगडच्या भागात अर्थात फक्त मध्य भारतातच सापडतो. मेळघाट मध्ये या पक्ष्याची यापूर्वीच नोंद झालेली असून मेळघाट बाहेरील जंगलात व जिल्ह्यात ही प्रजाती यापूर्वी आढळून आली नव्हती. मराठीतीत ठिपकेवाली सर्पिका, अशी ओळख असलेल्या या पक्ष्याचे इंग्रजी नाव स्पॉटेड क्रीपर व शास्त्रीय नाव सल्पोनेरीस स्पिलोनोटस असे आहे. याचा आकार अगदी लहान म्हणजेच वटवट्या किंवा शिंजीर पक्ष्याएवढा असून चोच शिंजीरप्रमाणे वाकलेली असते. पंखाच्या काळ्या रंगावर पांढरे ठिपके व पोटाखाली काळे पांढरे ठिपके व डोळ्यावरील काळ्या पट्टीवर लांब पांढरी भुवई असते. झाडाच्या बुंध्यावर व खोडावर फिरून हा पक्षी सालीमधील किडे खात अअसल्याची माहिती पक्षीमित्राने दिली. या नवीन नोंदीमुळे पोहरा मालखेड जंगलाच्या वैभवात अधिकच भर पडल्यामुळे पक्षीप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य