शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
7
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
8
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
9
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
10
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
11
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
12
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
13
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
14
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
15
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
16
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
17
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
18
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
19
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
20
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका

पाटील साहेब, हा घ्या संजय उदापूरकरचा फोटो

By admin | Updated: May 23, 2017 00:05 IST

संजय उदापूरकर हा कसा दिसतो हे तुम्हाला ठाऊक नाही ना? पाटील साहेब तुम्हाला जे जमले नाही ते आम्ही साधले आहे.

अंजनगाव क्रिकेट सट्टा : आता तरी अटक होणार ना ?लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : संजय उदापूरकर हा कसा दिसतो हे तुम्हाला ठाऊक नाही ना? पाटील साहेब तुम्हाला जे जमले नाही ते आम्ही साधले आहे. क्रिकेट सट्ट्याचा मुख्य बुकी कुख्यात संजय उदापूरकरचे हे छायाचित्र बघा आणि करा त्याला अटक! आयपीएल सट्टा प्रकरणातील मुख्य सूत्रधार परतवाडा येथील संजय उदापूरकर याला ओळखत नसल्याने त्याला अटक करणे कठीण आहे, असे अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार सुधीर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले होते. ‘लोकमत’ने शोधमोहीम राबवून संजय उदापूरकरचे अनेक फोटो मिळविले आहेत. अंजनगावचे ठाणेदार सुधीर पाटील यांची अडचण आता नक्कीच दूर होईल आणि ते उदापुरकरच्या मुसक्या आवळतील, अशी खात्री बाळगायला हरकत नसावी. एसपी अभिनाश कुमार यांनाही याप्रकरणाबाबत काहीही विचारले असता, ते ठाणेदारच माहिती देतील, असे सांगत असतात. सट्ट्यात अनेक प्रतिष्ठितांची नावे अंजनगाव सुर्जी : आता ठाणेदार एसपींचा विश्वासही सार्थ ठरवतील. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी शुक्रवार १२ मे रोजी शहरातील श्रीमंतांची वस्ती असलेल्या सावकारपुरा येथील आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकून तिघांना अटक केली होती. या क्रिकेट सट्ट्याचा मुख्य सूत्रधार परतवाडा येथील संजय उदापुरकर असल्याचे उघड झाले होते. मात्र, संजय उदापुरकर पसार झाल्याने त्याला वेळीच अटक करता आली नाही. तो राजस्थानात असल्याचे त्याचा मोबाईल ट्रेस केल्यावर आढळले होते. पोलिसांनी उदापूरकरला अटक करण्याची कोणतीही विशेष तयारी केली नाही. याबाबत विचारणा केली असता त्याला ओळखत नसल्याचे विचित्र उत्तर मिळाले. क्रिकेट सट्टा प्रकरणात अंजनगाव शहरातील अनेक प्रतिष्ठितांची नावे असल्याने याकडे पोलीस जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा शहरात गल्लोगल्ली सुरू आहे. मात्र, पोलिसांकडून हे प्रकरण विशेष मोठे नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न होत आहे. क्रिकेट सट्ट्यातील मुख्य बुकी संजय उदापूरकर अटकपूर्व जामीन मिळवू शकत असल्याने आम्ही त्याच्याविरूद्ध ठोस पुरावे गोळा करीत असल्याची माहिती ठाणेदारांनी दिली.कोण आहे संजय उदापूरकर ?संजय उदापूरकर हा परतवाड्यातील जैन मंदिराजवळ राहतो. त्याच्या घरासमोर छोटा बाजार व वरली-मटका मोठ्या प्रमाणात चालतो. अचलपूर तालुक्यातील सट्टा किंग म्हणून त्याची ओळख आहे. तालुक्यात चालणारा सट्टा हा संजय उदापूरकरच्या माध्यमातून लावला जातो. शहरातील एका गणेशोत्सव मंडळाचा तो अध्यक्ष आहे. गणपती स्थापनेसाठी तो मोठी देणगी देत लाखोंचा खर्च करतो. सुरक्षेसाठी नेहमी दहा-वीस बॉडीगार्ड त्याच्यासोबत असतात. खुल्या जीपमधून फिरत असल्याने त्याची खास ओळख आहे. अचलपूर-चिखलदरा व आसपासच्या तालुक्यात त्याचे ‘टेबल क्लब’ असल्याची माहिती मिळाली आहे.इसलिए धंदा करता हूंकुख्यात सट्टा किंग संजय उदापूरकर पोलिसांबद्दल खालच्या स्तराची भाषा वापरतो. तो नेहमी ‘मैं पुलीस के सामने पैसा फेकता हूं, इसलिये धंदा करता हंू’ असे बोलून, त्याच्याजवळ असलेल्या आर्थिक बळाची गुर्मी दर्शवित असतो.