शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाटील बंधूंना पोलिसांनी घडविली कोठडीची सहल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वत:ला डॉक्टर म्हणविणारा नंदकिशोर अरुण पाटील व त्याचा भाऊ विनोद अरुण पाटील यांनी मानव सेवा विकास फाउंडेशनमार्फत बँकॉक सहलीचे आयोजन १६ जून २०१९ रोजी केले होते. प्रतिव्यक्ती ४० हजार रुपये दराने एकूण ४१ पर्यटकांची रक्कम त्यांनी स्वत:च्या खात्यात जमा केली. ४१ पर्यटक मुंबई विमानतळावर आले. त्यावेळी नंदकिशोर व विनोद कुणीही आले नाही. नंदकिशोरने त्यांचे कॉल रिसिव्ह न करता, सहल तांत्रिक कारणांमुळे रद्द झाल्याचे व पैसे आठ दिवसांत परत करण्याचे मेसेज पाठवले.

ठळक मुद्दे२७ पर्यंत पीसीआर : सहलीच्या नावावर पर्यटकांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : थायलंड, बँकॉकमध्ये सहलीच्या नावावर पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील नंदकिशोर अरुण पाटील (३०) व विनोद अरुण पाटील (३२, दोघेही रा. शहापुरा, अंजनगाव सुर्जी) यांना अंजनगाव पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सहलीच्या नावावर ४१ पर्यटकांना लाखो रुपयांनी गंडविणाऱ्या पाटील बंधूच्या दोन रात्री पोलीस कोठडीत गेल्या. पोलिसांनी कोठडीची सहल घडवून आणल्याची प्रतिक्रिया त्यानंतर उमटली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वत:ला डॉक्टर म्हणविणारा नंदकिशोर अरुण पाटील व त्याचा भाऊ विनोद अरुण पाटील यांनी मानव सेवा विकास फाउंडेशनमार्फत बँकॉक सहलीचे आयोजन १६ जून २०१९ रोजी केले होते. प्रतिव्यक्ती ४० हजार रुपये दराने एकूण ४१ पर्यटकांची रक्कम त्यांनी स्वत:च्या खात्यात जमा केली. ४१ पर्यटक मुंबई विमानतळावर आले. त्यावेळी नंदकिशोर व विनोद कुणीही आले नाही. नंदकिशोरने त्यांचे कॉल रिसिव्ह न करता, सहल तांत्रिक कारणांमुळे रद्द झाल्याचे व पैसे आठ दिवसांत परत करण्याचे मेसेज पाठवले. परंतु, अद्याप रक्कम परत मिळाली नाही.पुसद, जरूड येथील दोघांकडून तक्रारपुसद येथील राजूसिंह धनसिंह जाधव (६२) व रजनी काळमेघ (रा. जरूड) यांनी २१ ऑक्टोबर रोजी अंजनगाव पोलीस ठाणे गाठून पाटील बंधूविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ४०६, ४२०, ४६८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेश जवरे तपास करीत आहेत.विमानाची तिकिटे बनावटराजूसिंह जाधव या माजी सैनिकाच्या तक्रारीनुसार, आरोपी नंदकिशोर पाटीलच्या नावे असलेल्या एसबीआयच्या शाखेतील खात्यात जाधव यांच्यासह रजनी काळमेघ यांनी एकूण २ लाख ४० हजार रु पये जमा केले. १५ एप्रिल ते ७ जून २०१९ या कालावधीत ही रक्कम जमा करण्यात आली. आरोपीने आपल्याला दिलेली विमानाची तिकिटे बनावट असल्याचा आरोप जाधव यांनी तक्रारीतून केला.

टॅग्स :tourismपर्यटनfraudधोकेबाजी