शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पटेलांनी ‘बो’म्हणताच परतले आदिवासी ! जिल्हाधिका-यांची १५ तासांची मनधरणी व्यर्थ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 17:47 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून पुनर्वसित झालेले हजारो आदिवासी पुनर्वसित वस्तीत कोणत्याच सुविधा नसल्याने मूळगावी परतले. त्यांना पुनर्वसनाच्या ठिकाणी परत नेण्याकरिता जिल्हाधिका-यांनी तब्बल १५ तास मनधरणी केली.

चिखलदरा (अमरावती), दि. 11 -  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून पुनर्वसित झालेले हजारो आदिवासी पुनर्वसित वस्तीत कोणत्याच सुविधा नसल्याने मूळगावी परतले. त्यांना पुनर्वसनाच्या ठिकाणी परत नेण्याकरिता जिल्हाधिका-यांनी तब्बल १५ तास मनधरणी केली. मात्र, आदिवासी बधले नाहीत. मात्र,  मध्यरात्री मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी आदिवासींसोबत कोरकूमध्ये संवाद साधला आणि ‘बो’ म्हणताच दोन हजारांवर अदिवासी वाहनांमध्ये बसून पुनर्वसित वस्तीत परतले. यामुळे तीन दिवसांपासून तणावात असलेल्या शासकीय यंत्रणेने रविवारी रात्री १२.३० वाजता मोकळा श्वास घेतला. तालुक्यातील आठ गावांमधून पुनर्वसित झालेल्या आदिवासींना नव्या वस्तीत शासनाद्वारे कुठल्याच सोयीसुविधा न मिळाल्याने व वारंवार केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने या आदिवासींनी ९ सप्टेंबर रोजी मुलाबाळांसह मूळगावी कूच केले होते. हे आदिवासी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभाक्षेत्रात गेल्याने जिल्हा प्रशासनासह राज्यात खळबळ उडाली होती. 

१५ तासांची चर्चा व्यर्थ... शनिवारी खटकाली गेटचे कुलूप तोडून संतप्त आदिवासींनी कुणालाही न जुमानता आपल्या बि-हाडासह मूळ गावात येऊन बस्तान मांडले. यामुळे संपूर्ण यंत्रणा हादरली. अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, व्याघ्र प्रकल्पाचे संचालक श्रीनिवास रेड्डी या वरिष्ठ अधिका-यांसह सर्व ताफा रविवारी सकाळी ७ वाजता जंगलाकडे निघाला. ९ वाजतापासून रात्री १२ वाजेपर्यंत सतत आदिवासींची मनधरणी करण्यात आली. 

राजकुमार पटेल यांची मध्यस्थी...  सतत तीन दिवसांपासून शासकीय यंत्रणेवर प्रचंड दबाव होता. वनकर्मचारी, पोलीस, कमाण्डो, दंगानियंत्रण पथक शेकडो जवान तैनात करण्यात आले होते. मात्र, आदिवासी त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिव प्रवीण परदेशी यांनी हा पेच सोडविण्यासाठी माजी आमदार राजकुमार पटेल यांच्याशी दोनदा संपर्क केला. अखेरीस रात्री १२.३० वाजता राजकुमार पटेल यांनी आदिवासींसोबत प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांनी ‘बो’ (चला) उच्चारताच  ३६ तासांपासून जंगलात शिरलेले आदिवासी २८ वाहनांमधून पुनर्वसित वस्तीत परतले. 

समिती गठित, मुंबईत बैठक... पुनर्वसित आदिवासींवर अन्याय झाल्याची कबुली देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अमोना, नागरतास, गुल्लरघाट, केलपाणी, सोमठाणा खु., सोमठाणा बु. धारगड, बारूखेडा या आठ गावांतील प्रत्येकी एक प्रतिनिधी माजी आमदार राजकुमार पटेल, आ. सुनील देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री व सचिव प्रवीण परदेशी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार आहेत. 

कारवाई कुणावर ? चिखलदरा तालुक्यातून अकोट व तेल्हारा तालुक्यात पुनर्वसन झाल्यावर आठ गावांतील पाच हजारांवर आदिवासींना मूलभूत सुविधा व योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले. यासाठी जबाबदार अधिका-यांवर कारवाईचा मुद्दा संतप्त आदिवासींनी उचलला आहे. तेव्हा प्रशासनातील अधिका-यांवर निलंबनाची कु-हाड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.