दुचाकी अपघातात पथ्रोटचा तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:14 AM2021-01-25T04:14:52+5:302021-01-25T04:14:52+5:30

परतवाडा : अंजनगाव रोडवर सावळीच्या पुढे शहापूर येणी पांढरी फाट्यालगत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दिनांक ...

Pathrot's young man killed in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात पथ्रोटचा तरुण ठार

दुचाकी अपघातात पथ्रोटचा तरुण ठार

Next

परतवाडा : अंजनगाव रोडवर सावळीच्या पुढे शहापूर येणी पांढरी फाट्यालगत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दिनांक २३ जानेवारी रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात दिनेश उर्फ गोलू सुरेश उके (२६, रा. पथ्रोट) हा तरुण ठार झाला आहे.

दिनेश हा परतवाड्याहून (एमएच २७ बीएम १२६९) या दुचाकीने पथ्रोटला जात होता. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जबरदस्त धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. या घटनेपूर्वी गोलू हा घराशेजारच्या व्यक्तीचा जेवणाचा डबा घेऊन पथ्रोटहून परतवाड्यातील एका खासगी दवाखान्यात पोहोचला होता. तेथील रुग्णाला डबा देऊन पथ्रोटला परत जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, अपघातानंतर बराचवेळ गोलूचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता. या अपघाताची माहिती मिळताच परतवाडा पोलीस ठाण्यातील पीएसआय गायकवाड व काॅन्स्टेबल सतीश जामोदकर घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी रुग्णवाहिकेतून गोलूला उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

Web Title: Pathrot's young man killed in a two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.