धामणगाव रेल्वे : मन स्थिर असल्याशिवाय ध्यान प्राप्त होत नाही़ अन् अध्यात्माच्या मार्गाकरिता मन स्थिर होणे गरजेचे आहे, असे मत ब्रह्मचारी संत मंगेश महाराज यांनी व्यक्त केले़ धामणगाव शहरातील श्रीविहार कॉलनी राठीनगर येथील श्री साई सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्यावतीने इच्छापूर्ती महाबली पंचमुखी हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा समारोेहात कलश स्थापना कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. संतांच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेतल्याने सर्व दु:ख नाहिशी होतात़ संताचा महिमा संत जाणतो़ भक्ती केल्यामुळे भाविक दोषमुक्त होतात़ नामचिंतनात ताकद आहे़ भगवान परमात्मा सुखाचा सागर आणि संत महासागर आहे़ भगवान परमात्मा चिंतात साठवावा, असा मार्मिक सल्ला त्यांनी दिला़ यावेळी सुश्री अल्काश्री यांची उपस्थिती होती़शोभायात्रा अन् सार्इंचा जयघोषसाई मंदिरातून बुधवारी रात्री हनुमान मूर्तीचे नगरभ्रमण करण्यात आले़ राठी नगरातून संत बेंडोजी महाराज यांच्या रथात ही मूर्ती ठेवण्यात आली होती़ राठीनगर ते शास्त्री चौकापर्यंत फुलांनी रस्ते सजविण्यात आले होते़ महिला भाविकांनी इच्छापूर्ती महाबली पंचमुखी हनुमान मूर्तीचे पूजन करून दर्शन घेतले़ महिला भजन मंडळ, बॅण्डपथक व साईबाबांच्या जयघोषाने ही विद्यानगरी दुमदुमून गेली होती. पंचमुखी हनुमान मूर्तीच्या शोभायात्रेचे नगरात परिक्रमा काढण्यात आली. यावेळी चौकाचौकांत रांगोळी, तसेच शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी भाविकांनी मूर्तीचे पूजन करून आरती केली.यामध्ये भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
मनाच्या स्थैर्यातून मिळतो अध्यात्माचा मार्ग
By admin | Updated: February 12, 2016 01:01 IST