शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

वरुडच्या संत्रा लिलाव मंडईत परप्रांतीय मजुरांचे लोंढे

By admin | Updated: November 28, 2015 01:04 IST

तालुक्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात असून मजुरांची नेहमीच वानवा असते. पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगढ तसेच मध्य प्रदेश आणि मेळघाटातून हजारो मजूर वरुडात दाखल झाले आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष : बालकामगारांच्या संख्येत वाढ वरूड : तालुक्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात असून मजुरांची नेहमीच वानवा असते. पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगढ तसेच मध्य प्रदेश आणि मेळघाटातून हजारो मजूर वरुडात दाखल झाले आहेत. मजुरीला येताना मुलाबाळांसह त्यांचे आगमन होत असल्याने लहान मुलेसुध्दा अल्पशा मजुरीवर बालपण हरवून लिलाव मंडईत संत्रा चढाई-उतराईचे काम करतात. एकीकडे शासन बालकामगार ठेवण्यास मनाई करते, तर दुसरीकडे शासनाचे अधिकारी, कर्मचारी हेच बालकामगारांना काम करताना उघड्या डोळ्यांनी पाहत असते. सरकारी निमसरकारी संस्थांचे बालकामगार कायद्याला तिलांजली देत असल्याने देशाचे उद्याचे भविष्य असलेल्यांचे बालपण केव्हाचेच हरपले आहे.संत्रा आंबिया बहराची आवक मोठ्या प्रमाणावर असल्याने दिवसागणिक ३० ते ३५ ट्रक संत्रा परप्रांतात पाठविला जातो. संत्रा बागेत तोडाई आणि भराईकरिता परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणावर आले आहेत. महागाईमुळे दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न असल्याने गरीब मजुरांच्या नशिबी मात्र दारिद्री आहे. लहान मुला, मुलींसह वृध्द माता-पित्यांना घेऊन सर्व कुटुंब कामाच्या शोधात वरुडात दाखल झालेत. कमवा आणि शिका गरिबांच्या मुलांच्या नशिबीच असल्याने ९ ते १४ वयोगटातील खेळणे बागडण्याचे वय कामात गमावून शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळी आणि हिवाळी सुटीत होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाचा ध्यास असला तरी गरिबीने पछाडलेले असते. यामुळे शाळा संपली की ते कामाच्या शोधात असतात. परंतु यावर्षी संत्रा हंगामात मजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने संत्रा भराईच्या कामात बाजार समितीच्या संत्रा लिलाव मंडईत मध्य प्रदेश तसे छत्तीसगढमधील परप्रांतीय आदिवासी मजूर आणि बालकामगारांची मोठी फौज आढळून येते. केवळ दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी संत्र्याच्या भराईसाठी अत्यल्प मजुरीवर काम करण्यासाठी मजुरांचे लोंढे शहरात दाखल झाले आहे. उघड्यावरच सदर मजुरांचा संसार थटल्याचे चित्र बाजार समितीच्या आवारात दिसून येते. यांना राहण्याची व्यवस्था कुठेही दिसून येत नाही. एवढेच नव्हे, तर मोठे काम मिळत नसल्याने उपाहारगृहे, बसस्थानकावर गोळ्या, बिस्कीट विक्री करणे अशी कामे त्यांच्याकडून अल्प मोलमजुरीत केली जात असल्याने या दुकानदारांकडून यांना कामावर ठेवले जातात. परंतु केंद्र शासनाने बालमजुरी प्रतिबंधक कायदा केला. यामध्ये संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. परंतु कोणावरही कार्यवाही होत नसल्याने ेखुलेआम बालकामगार काम करताना आढळून येतात. केवळ दुकानदाराकडून नावापुरत्या पाट्या लावून ‘येथे बालकामगार नाहीत’ अशी सूचना स्पष्ट अक्षरात लावलेली असते. यामुळे अधिकाऱ्यांना उघड्या डोळयांनी केवळ पाटी दिसते. बालकामगार असल्यास चिरीमिरी देण्यापलीकडे काहीच होत नसल्याने सर्वांचे फावले आहे. एकीकडे शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी शिक्षण विभागाची पथके पाठवून शोध घेतला जातो. परंतु बालकामगारांच्या नशिबी शिक्षण आलेच नाही. यामुळे मांजराच्या गळ्याला घंटा कोण बांधणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)