लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खीरपाचे पीक कापनी प्रयोग सुरू झाले आहे. यामध्ये पिकांच्या अचुक उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी विभागीय आयुक्त पियूषसींग यांनी या अभियानात शुक्रवारी भातकुली तालुक्यात सहभाग घेतला.यंदाच्या खरिपामध्ये ६०३ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स द्वारे जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात आहे. मागील खरिपाच्या तुलनेत या खरिपात शेतकºयांचा सहभाग वाढल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीत पोर्टल नुसार १,३८,००० शेतकºयांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविलेला आहे.या अभियानात विभागीय आयुक्त पियूष सिंग, जिल्हा कृषी अधीक्षक अनील इंगळे , उपविभागीय अधिकारी विनोद शिरभाते , तहसीलदार येळे , तालुका कृषी अधिकारी कवाने , तालुका सांख्यिकी अधिकारी महल्ले, महसूल मंडळ अधिकारी चौरपागर, मंडळ कृषी अधिकारी दळवी , कृषी सहायक हेमंत इंगळे यांसोबतच तालुका विमा प्रतिनिधी नितेश तायडे सोबत इतर पीक कापणी प्रयोगासाठी हजर होते. प्रयोग यशस्वी झाला असून मुंगाचे उत्पन्न ५.९६५ किलो ग्रॅम झालेले समोर आले. पिकाची नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत दिली जाते. पिकाचा अचूक उत्पन्नाचा अंदाज काढण्यासाठी महसूल, पंचायत समिती व कृषी विभगातर्फे पीक कापणी प्रयोग केले जातात .तर एकही शेतकरी वंचित राहणार नाहीशासनाकडून योग्य प्रतिसाद व वेळेवर पीक कापणी प्रयोग झाल्यास तसेच योजनेच्या सूचनांचे पालन केले तर एक ही शेतकरी यापासून वंचीत राहू शकणार नाही. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांने शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसानीच्या कारणावरून (पाणी साठणे, भूस्खलन किंवा गारपीट) कंपनी त्यांना नुकसान भरपाई देऊ शकते याबद्दल मार्गदर्शन झाल्यास बराचसा फरक पडून योजनेच्या सूचनांचे अतिशय चांगल्या प्रकारे अवलोकन होऊन यंदाा या कंपनी मार्फत कोणालाच अडचणी येणार नाहीत, असे सांगण्यात आले.
पीक कापणी प्रयोगात विभागीय आयुक्तांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 22:34 IST
यंदाच्या खीरपाचे पीक कापनी प्रयोग सुरू झाले आहे. यामध्ये पिकांच्या अचुक उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी विभागीय आयुक्त पियूषसींग यांनी या अभियानात शुक्रवारी भातकुली तालुक्यात सहभाग घेतला.यंदाच्या खरिपामध्ये ६०३ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे.
पीक कापणी प्रयोगात विभागीय आयुक्तांचा सहभाग
ठळक मुद्देयशस्वी प्रयोग : भातकुली तालुक्यात मुगाचे उत्पन्न ५,९६५ किलोग्रॅम