फोटो पी २१ चांदूर
चांदूर बाजार - तालुक्यातील अग्रणी शाळा असलेल्या जिजामाता विद्यालयात मी स्वतः शिक्षण घेतले. आज नव्याने बांधकाम होत असलेल्या या शाळेच्या इमारतीच्या बांधकामात माझा सहभाग असणे हे माझे भाग्यच आहे, असे उद्गार शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले. जिजामाता विद्यालयातच हा सोहळा झाला.
पीपल्स वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख याप्रसंगी अध्यक्षस्थानी होत्या. ना. बच्चू कडू म्हणाले, कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत त्याकाळी कन्या विद्यालय होती. आज या ठिकाणी तीन माळ्याची इमारत उभी आहे. वसुधाताईंच्या संस्थेत शिक्षण घेतल्याचा मला अभिमान आहे. विद्यालयाच्या इमारत बांधकामास आपण आर्थिक मदत केली. ही मदत म्हणजे माझे कर्तव्य आहे. पुढील काळातही इमारतीच्या बांधकाम करिता आपण सहकार्य करू, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले. यावेळी जिजामाता विद्यालयातून दहाव्या वर्गात गुणानुक्रमे व शंभर टक्के गुण घेऊन प्रथम येणाऱ्या वेदांत धर्माळे व संघर्ष काळे या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.
वसुधा देशमुख यांनी ना. बच्चू कडू यांचा सत्कार केला. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा व्यक्त केल्या. बच्चू कडूंनी धरणाची राहिलेली अपूर्ण कामे पूर्ण करावी व तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ करण्याकरता प्रयत्न करावे, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक माणिक मलवार यांनी केले. आभार संजय चुनडे यांनी मानले.
--------------
आजी-माजी राज्यमंत्र्यांमध्ये तीन तास रंगली चर्चा
माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख यांच्या निवासस्थानी भेटीदरम्यान त्यांचा राजकीय अनुभव तसेच काम करण्याची पद्धत विषयी राज्यमंत्री बचू कडू यांनी भरभरून स्तुती केली. मतदारसंघात केलेली कामे, येणारे अडथळे, अपूर्ण राहिलेली कामे याविषयी दोन्ही आजी-माजी राज्यमंत्र्यांमध्ये तीन तास चर्चा रंगली. वसुधा देशमुख यांनी अपूर्ण राहिलेले विकासकामाचे स्वप्न बच्चू कडू हे पूर्ण करणार असल्याचा विश्वस व्यक्त केला.