सहा महिन्यांची चिमुकली ‘नकोशी’अमरावती : अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला विहिरीत फेकून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. हा क्रूर प्रकार वडाळी राम मंदिरानजीक शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आणि पंचक्रोशीत खळबळ उडाली. फे्रजरपुरा पोलिसांनी ‘नकोशी’चे अशा क्रौर्याने प्राण घेणाऱ्या माता-पित्यांची शोधमोहीम सुरु केली आहे. एकीकडे शासन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देते, स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्यापही मुलगी झाली की नाका-तोंडावर आठ्या पाडणारे पालक दिसून येतात. त्यातील काही नाईलाजास्तव त्या मुलीचा सांभाळ करतात तर काही पालक निर्दयतेची परिसीमा गाठून ‘नकोशी’चे प्राण घेण्यापर्यंत मजल मारतात. शुक्रवारी सकाळी वडाळी परिसरात उघडकीस आलेल्या या घटनेवरून तर ही बाब अधिक स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे. राम मंदिरानजीकच्या विहिरीत लहान बाळाचा मृतदेह तरगंत असल्याची माहिती फे्रजरपुरा पोलिसांना मिळाली होती. नागरिक अनभिज्ञ कसे?वडाळीतील राममंदिर परिसरात दिवसभर नागरिकांची वर्दळ सुरुच असते. त्यामुळे लोकवस्तीतील विहिरीत फेकलेल्या बाळाबद्दल कोणालाच कसे कळले नाही, याबद्दल पोलीस साशंक आहेत. सहा ते सात महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही. तपासाअंती गूढ बाहेर येईल. पी.एस.वंजारी, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा पोलीस ठाणे.
आई-वडिलांची निर्दयता : वडाळीतील विहिरीत आढळला मृतदेह
By admin | Updated: October 15, 2016 00:10 IST