लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथील संत परशराम महाराज मंदिरातून चोरीला गेलेल्या चांदीच्या पादुका पोलिसांनी हस्तगत केल्या. स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी येवदा ते सांगळूद मार्गावर सापळा रचून आरोपीला अटक केली.अब्दुल अकील अब्दुल वहीद (२८, रा. येवदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १७ जून रोजी मंदिरातून दानपेटीतील पैसे व चांदीच्या पादुका गहाळ झाल्या. येवदा ठाण्यात याप्रकरणी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला. स्थानिक गुन्हे शाखेने तपासादरम्यान १६ जुलै रोजी गोकुल हरिदास उमाळे (३४, रा. येरंडगाव) याला अटक केली. त्याच्याकडून अब्दुल अकीलचा सुगावा लागला. पसार असलेला हा आरोपी पादुका विक्रीकरिता घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने येवदा ते सांगळूद मार्गावर त्याला ताब्यात घेतले. त्याने एक अल्पवयीन व गोकुलसमवेत चोरी केल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी सूरज बोंडे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक आशिष चौधरी, सहायक उपनिरीक्षक संतोष मुंदाने, कॉन्स्टेबल दिनेश कनोजीया, चालक नितेश तेलगोटे, विशाल भानुसे, शिवा शिरसाट यांच्या पथकाने कारवाई केली.
परशराम महाराजांच्या पादुका हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST
१७ जून रोजी मंदिरातून दानपेटीतील पैसे व चांदीच्या पादुका गहाळ झाल्या. येवदा ठाण्यात याप्रकरणी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला. स्थानिक गुन्हे शाखेने तपासादरम्यान १६ जुलै रोजी गोकुल हरिदास उमाळे (३४, रा. येरंडगाव) याला अटक केली. त्याच्याकडून अब्दुल अकीलचा सुगावा लागला. पसार असलेला हा आरोपी पादुका विक्रीकरिता घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.
परशराम महाराजांच्या पादुका हस्तगत
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : भाविकांनी व्यक्त केले समाधान