शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

- हे तर कागदावरचे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:15 IST

महापालिका क्षेत्रातील ३० डिसेंबर २०१५ किंवा त्यापूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची अधिसूचना राज्य शासनाने जारी केली.

ठळक मुद्देकेवळ प्रसिद्धीपत्रक : अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची अधिसूचना

प्रदीप भाकरे ।आॅनलाईन लोकमतअमरावती : महापालिका क्षेत्रातील ३० डिसेंबर २०१५ किंवा त्यापूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची अधिसूचना राज्य शासनाने जारी केली. त्यानुसार महापालिकेनेही त्याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढले. मात्र, महिन्याभरानंतर ही अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची अधिसूचना कागदापुरती मर्यादित राहिली आहे.अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी जमिनीच्या चालू बाजारभावाच्या (रेडिरेकनर) चार टक्के विकास शुल्क तर प्रशमन शुल्क म्हणून आणि मुलभूत सुविधा शुल्क म्हणून १६ असे एकूण २० टक्के दंड आकारला जाणार आहे. तथापि, महापालिकेच्या एडीटीपी विभागाने याबाबत कुठलीही जनजागृती वा प्रसिद्धी केलेली नाही. अमरावती क्षेत्रातील सर्व नागरिकांनी महाराष्टÑ शासनाच्या ‘प्रशमित संरचना अभियान’ या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करून एडीटीपी थांबले आहे. प्रत्यक्षात नेमके कुठले बांधकाम नव्या अधिसूचनेनुसार नियमित वा अधिकृत करता येईल, याची संपूर्ण माहिती मराठी भाषेत उपलब्ध करून द्यायला हवी होती. याबाबत ७ आॅक्टोबर २०१७ चा शासन निर्णय इंग्रजीत असून अत्यंत क्लिष्ट स्वरुपाचा आहे. त्यामुळे नेमके कुठले अनधिकृत बांधकाम दंड भरून नियमित करता येईल, याची कुठलीही माहिती अमरावतीकरांना नाही.शहरातील ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली. ७ आॅक्टोबर २०१७ पासून पुढील ६ महिने अनधिकृत बांधकामधारकांना अर्ज भरावे लागतील. महाराष्टÑ प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ अंतर्गत बांधकाम परवानगी नवीन संरचनेनुसारचा अर्ज एडीटीपी व संबंधित झोन कार्यालयामध्ये सादर करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात वृत्तपत्रातील जाहीर प्रकरणाशिवाय एडीटीपीने काहीच केले नाही. त्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारले नाही. नियमितीकरणासाठी कुठलीही जनजागृती झालेली नाही. याबाबत नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेंद्र कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही, ते सुटीवर असल्याचे सांगण्यात आले.सर्व आघाड्यांवर नकारघंटाअवैध बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असली तरी नागरिकांचे अर्ज स्विकारण्यासाठी महापालिका मुख्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला नाही. नियमितीकरणाच्या प्रक्रियेची माहिती पुस्तिका हवी, प्रकाशित करण्यात आलेली नाही. अर्ज करताना नागरिकांना अडचण येवू नये, त्यासाठी अर्ज वास्तूविशारदांकडून मागवावेत की मालमत्ताधारकांनी स्वत: आणावेत, ते स्पष्ट करण्यात आलेले नाही. अर्जाचा नमुना तयार करण्यात आलेला नाही.ही आहे अपेक्षाअर्ज करताना शुल्क किती आकारायचे, हे निश्चित झालेले नाही. प्रत्येक भागातील जागेचे वेगवेगळे दर आहेत. जमिनीच्या चालू बाजारभावानुसार शुल्क आकारणी होईल की कशी? याबाबतही संभ्रम आहे. अवैध बांधकामे नियमित झालेल्या नागरिकांना पूर्वीचा शास्तीकर भरावा लागणार किंवा कसे? हे अद्याप स्पष्ट नसल्याने एडीटीपीने त्याबाबत सविस्तर पुस्तिका तीही मराठीतून काढावी, अशी अमरावतीकरांची अपेक्षा आहे.