अमरावती : बहुजनांचे आराध्य दैवत म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल -रूक्मिणीच्या भेटीची आषाढी एकादशीला ओढ असते. वारकरी पायी जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतात. हा शिरस्ता तरूण पिढीनेदेखील आत्मसात केला. मात्र, वारकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून दरवर्षी रेल्वे गाडी सुरू केली जाते. यंदा पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडीची पहिली फेरी ६ जुलै रोजी धावणार आहे.मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून पंढरपूर स्पेशल गाडीच्या एकूण चार फेऱ्या निश्चित केल्या आहेत. आषाढी एकादशीचे औचित्य साधून अमरावती - पंढरपूर स्पेशल (गाडी क्रमांक ०११५५) ची पहिली फेरी ६ जुलै रोजी दुपारी २ वाजता नवीन अमरावती (अकोली स्टेशन) येथून पंढरपूरकडे रवाना होणार आहे. तर नवीन अमरावती स्थानकावरुन दुसरी फेरी पंढरपूरकडे ९ जुलै रोजी दुपारी २ वाजता रवाना होईल. या गाडीत आरक्षण आणि सामान्य अशा दोन्ही प्रकारच्या डब्यांचा समावेश असेल, असे मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांनी सांगितले.
पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर स्पेशल रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:35 IST
बहुजनांचे आराध्य दैवत म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल -रूक्मिणीच्या भेटीची आषाढी एकादशीला ओढ असते. वारकरी पायी जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतात. हा शिरस्ता तरूण पिढीनेदेखील आत्मसात केला. मात्र, वारकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून दरवर्षी रेल्वे गाडी सुरू केली जाते. यंदा पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडीची पहिली फेरी ६ जुलै रोजी धावणार आहे.
पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर स्पेशल रेल्वे
ठळक मुद्देपहिली फेरी ६ जुलैला : वारकऱ्यांसाठी सुविधा