शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार रोखण्यात पंचायत राज समिती ‘फेल’; ‘कॅग’चे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 10:54 IST

सन १९७४ ते २०१५ दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती संवर्गासाठी राबविलेल्या योजनांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका नागपूर येथील महालेखाकार विभागाने (कॅग) आपल्या अहवालातून ठेवला आहे.

ठळक मुद्दे१९७४ ते २०१५ पर्यंतची वस्तुस्थिती शासनाला कळविली नाहीतब्बल ४१ वर्षे होत राहिला भ्रष्टाचार

गणेश वासनिक ।आॅनलाईन लोकमतअमरावती : सन १९७४ ते २०१५ दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती संवर्गासाठी राबविलेल्या योजनांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका नागपूर येथील महालेखाकार विभागाने (कॅग) आपल्या अहवालातून ठेवला आहे. पंचायत राज समिती ही बाब शासनाच्या लक्षात आणून देण्यात अयशस्वी ठरली आहे.शासन योजना अथवा उपक्रम राबविताना निकष, नियमावली ठरवून निधीची तरतूद करते. योजनांना मूर्त रूप देण्याची जबाबदारी ही प्रशासनावर सोपविली जाते. यात बहुतांश योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मंजूर केला जातो. लोकसंख्येनेनुसार नियोजन, बृहत आराखडा, विकासकामांचे स्वरूप, अनुदान वाटपाची सूची, आर्थिक व्यवस्थापन, कामे मंजूर करणे आणि अनुदान आॅडिट लोकल फंडचे अधिकारी नियुक्त असताना एससी, एसटी संवर्गासाठी राबविल्या जाणाऱ्या अनेक योजनांमध्ये १९७४ पासून ते २०१५ पर्यंत म्हणजे तब्बल ४१ वर्षे भ्रष्टाचार, अपहार होत असताना ही बाब राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिली नाही.एवढेच नव्हे तर राज्यात लोकल आॅडिटची नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोकण व मुंबई अशी सात विभागीय कार्यालये असतानासुद्धा येथील अधिकाऱ्यांनी मागास निधीची लूट थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. परिणामी पंचायत राज समितीच्या पदाधिकाऱ्यांचा अफलातून कारभार म्हणजे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा सुरू आहे. . गत ४१ वर्षांत मागासवर्गीयांच्या हक्काच्या हजारो कोटींची बिनधास्त लूट झाली. याप्रकरणी दोषी असलेल्या पंचायत राज समिती अधिकारी-पदाधिकाऱ्यांवर शासन काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.आॅडिट लोकल फंडने कामात कुचराई केली असेल तर ही बाब नक्कीच धक्कादायक आहे. ‘कॅग’च्या अहवालानुसार योजनांमध्ये अनियमितता, भ्रष्टाचार झाल्याचे नमूद असल्याने दोषींवर कारवाईसाठी विधिमंडळ पंचायत राज समिती पुढाकार घेईल.- सुधीर पारवे, अध्यक्ष, पंचायत राज समिती, विधिमंडळ महाराष्ट्र

टॅग्स :Crimeगुन्हा