वन्यजीवांची सुरक्षितता : जंगलात पाण्यासाठी भटकंती नाहीअमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यजीवांना जंगलाबाहेर पडावे लागते. मात्र, यंदा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दोन किलोमीटर अंतरावर एका पाणवठ्याची निर्मिती, असा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी व्याघ्र प्रकल्पात सुरु झाली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना, गुगामल, अकोट व अकोला वन्यजीव विभागात नैसर्गिक व कृत्रिम असे ९६० पाणवठे आहेत. मात्र, वन्यजीवांची वाढत चाललेली संख्या बघता हे पाणवठे कमी पडू लागले आहेत. मेळघाटात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत अत्यल्प आहेत. त्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतु उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यजीवांच्या शिकारी अथवा मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पातील उपवनसंरक्षकांना दर दोन किलोमीटरच्या आत एक पाणवठा निर्माण करण्याच्या सूचना क्षेत्र संचालकांनी दिल्या आहेत. काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले जाणार आहेत. १५ मार्चपर्यत वन्यजीवांसाठी पाणवठे सज्ज राहतील, असा दावा व्याघ्र प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.१५ दिवसांत पाणवठे तयारअमरावती : जेमतेम मार्च महिना सुरू झाला असून उन्हाची दाहकता वाढू लागली आहे. यंदा उन्हाळा अधिक तापणार, असे संकेत वेधशाळेने दिले आहेत. त्यानुसार एप्रिल, मे व जून महिन्यात जंगलात पाणीसमस्या उद्भवणार नाही, ही काळजी घेतली जात आहे. तसेच जंगलात आग लागू नये, यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ राबविला जात आहे. यापूर्वी मेळघाटात लागलेल्या आगीच्या घटनांचा आढावा घेत व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस.रेड्डी यांनी आग रोखण्यासाठी संयंत्रे, अद्ययावत साहित्य, पुरेसे मनुष्यबळ सज्ज ठेवले आहे. व्याघ्र प्रकल्पातील जंगलात सर्वाधिक नैसर्गिक पाणवठे तयार करण्यावर भर दिला जात आहे. (प्रतिनिधी)मेळघाटात हे आहेत वन्यपशूमेळघाट व्याघ्र प्रकल्प वनसंपदेने नटलेला आहे. वन्यपशू, सरपटणारे प्राणी देखील मोठ्या प्रमाणात आहेत. यात वाघ, बिबट, हरिण, काळवीट, तडस, खवल्या मांजर, सायाळ, रानकुत्रे, सांबर, रानडुक्कर, शेवशिंगा, लांडगा, नीलगाय, अस्वल, भेडकी, गव्हा, लाल तोंडाचे माकड, चितळ, रानमांजर आदींचा समावेश आहे. इतरही अनेक पशू या जंगलात मुक्तसंचार करतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत यावेळी उन्हाळ्यात वन्यपशू, प्राण्यांना पाणीटंचाई भासणार नाही. मागील आठवड्यातील बैठकीत हा मुद्दा आवर्जुन हाताळण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सूचना दिल्या असून १५ दिवसांत पाणवठे तयार होतील.- एम.एस.रेड्डीक्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प
व्याघ्र प्रकल्पात दोन किलोमीटरवर पाणवठे
By admin | Updated: March 2, 2017 00:03 IST