शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात चोहीकडे बहुगुणी पळसाने केली लाल-शेंदरी उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 12:29 IST

वसंताच्या आगमनापूर्वी निष्प्रभ-निस्तेज झालेल्या धरतीवर लाल रंगाची उधळण होण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देवसंतागमन, होलीकोत्सवाची चाहूल

सूरज दाहाट ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वसंताच्या आगमनापूर्वी निष्प्रभ-निस्तेज झालेल्या धरतीवर लाल रंगाची उधळण होण्यास सुरुवात झाली आहे. जंगलात अन् रस्त्याच्या किणारी असणारा पळस बहरला असून जणू तो लाल रंगाची उधळणच करीत असल्याचा भास होत आहे. पळस सध्या चोहीकडे बहरला आहे. लाल, केशरी आणि क्वचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.

पळसाचे पूर्वापार महत्त्व२०-२५ फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात. कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच, अशी म्हण प्रचलित आहे. पानझडीत सर्व पाने गळून गेल्यावर पळसाला फुलांचे घुमारे फुटतात. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत. पूर्वी या पानांपासूनच मोठ्या पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात. आता काळ बदलला तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही.

पळसाच्या फुलापासून नैसर्गिक रंग

पूर्वी धूलिवंदनाला एकमेकांच्या अंगावर उधळण्यासाठी उपयोगात येणारा नैसर्गिक रंग बनविण्याकरिता पळस फुलांचा वापर केला जात असे. तर आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर होत असे. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले तर त्वचारोग नाहीसा होतो, असेही आयुर्वेदात म्हटले आहे. पळसाच्या बियांचाही औषधीसाठी वापर केला जातो.

डोळ्यांना सुखावणाराबहरात आलेला पळस तर अक्षरश: ज्वालेसारखा दिसू लागला आहे, तर काही पळस युद्धात जखमी होऊन रक्तबंबाळ झालेल्या सैनिकासारखे दिसत आहेत. फुललेल्या पळसाच्या झाडाकडे पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला असून डोळ्यांना सुखावणारा ठरू लागला आहे.

टॅग्स :forestजंगल