पान ३ साठी
शेंदूरजना घाट : स्थानिक नगरपालिकेच्या वतीने येथील शालेय विद्यार्थी व मुलींकरीता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक दीप अनिल फुटणे याने पटकविला. तर दुसरा क्रमांक पलक अरविंद पाटील हिने प्राप्त केला आणि तिसरा क्रमांक रेशमी केशव बागडे हिने मिळविला.नगराध्यक्ष रूपेश मांडवे, मुख्याधिकारी गजानन भोयर, नगरसेवक जयप्रकाश भोंडेकर यांच्या हस्ते विजेते व स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाण पत्र, धनादेश व शिल्ड देण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत स्वच्छता व पर्यावरण या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली.
संचालन व प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास आठवले यांनी केले. आभार प्रदर्शन समुदाय संघटक उमेश माहोरे यांनी केले. कार्यक्रमाला आरोग्य निरीक्षक रणजीत सोनेकर, विक्रम खोडके, कुणाल आठवले, आकाश सोनेकर तसेच कर्मचारी यांनी सहकार्य केले.