शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

संस्कार भारतीचे ‘पाडवा पहाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 10:38 PM

येथील ‘संस्कार भारती’ च्या वतीने पाडवा पहाट अलोट गर्दीच्या साक्षीने रविवारी पार पडला. शंभरावर तरुण कलावंतांनी नृत्य, नाट्य, संगीत, रांगोळी आणि चित्रकला या कलाप्रकारांच्या माध्यमातून दर्जेदार सादरीकरण करून अमरावतीकरांची उत्स्फूर्त दाद घेतली.

ठळक मुद्देअलोट गर्दी : नेत्रदीपक सोहळा

आॅनलाईन लोकमतअमरावती : येथील ‘संस्कार भारती’ च्या वतीने पाडवा पहाट अलोट गर्दीच्या साक्षीने रविवारी पार पडला. शंभरावर तरुण कलावंतांनी नृत्य, नाट्य, संगीत, रांगोळी आणि चित्रकला या कलाप्रकारांच्या माध्यमातून दर्जेदार सादरीकरण करून अमरावतीकरांची उत्स्फूर्त दाद घेतली.स्थानिक व्यंकटेश लॉनवर गुढीपाडव्याला राबवल्या जाणाऱ्या ‘पाडवा पहाट’ या उपक्रमाचे यंदाचे १७ वर्ष होते. रा. स्व. संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख सुनील देशपांडे, खा. आनंदराव अडसूळ, आ. सुनील देशमुख, महापौर संजय नरवणे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, संस्कार भारतीचे प्रांत संघटनमंत्री अजय देशपांडे, उपाध्यक्ष मोहन गंगवाणी, कोषाध्यक्ष अनघा मोहरील, संस्कार भारती शाखेच्या अध्यक्ष जयश्री वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत गुढीचे पूजन करण्यात आले.विश्वविजयी अलेक्झांडरच्या स्वारीला चाणक्य, चंद्रगुप्त यांनी समर्थ उत्तर देऊन त्याला भारतातून पळण्यास बाध्य केले. विजय नगरचे साम्राज्य व कृष्णदेवरायांचा पराक्रम, सिंध प्रांताचा राजा दाहीरसेन, थोरला बाजीराव पेशवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, राणी पद्मावती, १८५७ चे स्वातंत्र्य समर आणि देशाला मिळालेले स्वातंत्र्य असा इतिहासातील सोनेरी पानांचा आढावा रविवारच्या पाडवा पहाट मध्ये घेण्यात आला. संस्कार भारतीच्या ‘साधयती संस्कार भारती भारते नवजीवनम’ या ध्येय गीताने प्रारंभ तर वंदे मातरमने समारोप झाला. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला या शिवराज्याभिषेकाच्या गीताने व प्रसंगाने विशेष दाद घेतली. या कार्यक्रमाचे निवेदन शिवराय कुळकर्णी व अश्विनी पारळकर यांनी केले.अजित वडवेकर, विशाल तराळ आणि प्रसाद खरे यांनी नाट्य दिग्दर्शन तर जयश्री वैष्णव यांनी संगीताचे दिग्दर्शन केले.रसिका कौंडण्यने वाळूचा वापर करून महापुरुषांच्या प्रतिमा साकारल्या होत्या.