शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सात चित्रपटगृहांत आजपासून ‘पद्मावत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 22:56 IST

शहरातील सात चित्रपट गृहांतील नऊ पडद्यांवर 'पद्मावत' चित्रपट गुरुवारपासून प्रदर्शित होणार आहे.

ठळक मुद्देआंदोलनकर्त्यांवर कारवाईचे आदेश : पोलीस आयुक्तांनी केली पाहणीकडेकोट बंदोबस्त

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील सात चित्रपट गृहांतील नऊ पडद्यांवर 'पद्मावत' चित्रपट गुरुवारपासून प्रदर्शित होणार आहे. काही संघटनांचा या चित्रपटाला होणारा विरोध पाहता अमरावतीमधील सात चित्रपटगृहांना पोलिसांनी सरंक्षण दिले आहे. बुधवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांंनी गोपालनगरस्थित ई-आॅरबिट चित्रपट गृहाला भेट देऊन तेथील बंदोबस्ताचा आढावा घेत सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी योग्य सूचना दिल्या.सर्वोच्च न्यायालयात व सेंसार बोर्डाने पद्मावत चित्रपटाला हिरवी झेंडी दिल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेसाठी बंदोबस्त ठेवण्याचे पोलिसांना सुचविले. तरीही देशातील काही ठिकाणी पद्मावत चित्रपटाला विरोध झालाच. अमरावती शहरातही विरोधाची स्थिती असल्याने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी चित्रपटगृहावर चोख बंदोबस्त लावला आहे.बुधवारी शहरातील ई-आॅरबिट व चित्रा या दोन्ही चित्रपटगृहात सायंकाळी 'पद्मावत'चा प्रीमियर शो होता. त्या ठिकाणी काही अप्रिय घटना घडू नये, या दृष्टीने दोन्ही चित्रपट गृहांना पोलीस संरक्षण दिले. स्वत: पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी चित्रपट गृहाला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, एसीपी चेतना तिडके, पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी, नीलिमा आरज, वाहतूक शाखेचे अर्जुन ठोसरे, अजय मालवीय उपस्थित होते. चित्रपटगृहात येणारे दर्शक कुठून येईल व कसे बाहेर जातील, त्यांची पार्किंग व्यवस्था कशी आहे, याबाबत सीपींनी आढावा घेतला.बॅरिकेटस् लागलेपद्मावत चित्रपटास प्रेक्षकांची गर्दी उसळण्याची शक्यता पाहता पोलीस आयुक्तांनी पोलीस बंदोबस्ताचे योग्य ते नियोजन केले आहे. चित्रपटगृहात येणाºया नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने बॅरिकेटस् लावून एक मार्गी व्यवस्था करण्यात आली आहे.आंदोलनकर्त्यांवर करडी नजरपद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी आंदोलनकर्ते कोठूनही दडगफेक करू शकतात. त्यादृष्टीने चित्रपटगृहाच्या आजूबाजूच्या पाचशे फुटांपर्यंत पोलीस गस्त लावणार आहे. संशयित व्यक्ती आणि आंदोलकांवर करडी नजर ठेवून त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहे.३०० पोलीस तैनात राहणारशहरातील चित्रा, सरोज, राजलक्ष्मी, ई-आरबिट, प्रभात व राजेश १ या चित्रपट गृहातील ९ स्क्रिनवर गुरुवारपासून पद्मावत चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटगृहांना ३०० पोलीस सरंक्षण देणार आहेत. प्रत्येक चित्रपटगृहाच्या सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी असा बंदोबस्त लावला आहे.वाहतूकही वळविणारपद्मावत चित्रपट प्रदर्शनास विरोध पाहता नागरिकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने २५ जानेवारी रोजी संबंधित चित्रपटगृहासमोरील मार्गावरील वाहतुकीत गरजेनुसार बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पीआयअर्जुन ठोसरे यांनी केले.