शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाच ठिकाणी होणार ऑक्सिजन निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

कोरोना साथ लक्षात घेता पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध कामांना गती दिली. कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज पूर्ण व्हावी म्हणून कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ई-टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती. ती प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रकल्प निर्मिती चालना मिळाली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या प्रयत्नाना यश, प्रकल्प उभारणीच्या कामाला गती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती  : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) व जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील काही उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये अशा पाच ठिकाणी वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे धारणीसह पाच ठिकाणी वैद्यकीय दर्जाचा प्राणवायू निर्माण होऊन गरजू रुग्णांसाठी त्याचा उपयोग होईल, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी सांगितले.कोरोना साथ लक्षात घेता पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध कामांना गती दिली. कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज पूर्ण व्हावी म्हणून कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ई-टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती. ती प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रकल्प निर्मिती चालना मिळाली आहे. ना. ठाकूर यांनी दूरदृष्टी ठेवून हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले व  प्रकल्प निर्मितीसाठी पालकमंत्र्यांनी वेळोवळी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने प्रकल्प निर्मिती कार्याला वेग आला आहे.कोरोनाग्रस्तांना तातडीने प्राणवायू उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा कोविड रुग्णालयासह पाच ठिकाणी  प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाला २५९ ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा होणार आहे. ऑक्सिजन निर्मिती केंद्राची उभारणी होत असल्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भरून निघणार आहे.

शासकीय रुग्णालयांना दिलासाविभागीय संदर्भ रुग्णालयातील जिल्हा कोविड रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, धारणी उपजिल्हा रुग्णालय, तिवसा ग्रामीण रुग्णालय, नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालय याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्राणवायू निर्मिती केंद्रात अनुक्रमे ८८ ऑक्सिजन सिलिंडर, ५८ सिलिंडर, ४४ सिलेंडर, १९ सिलिंडर, १९ सिलेंडर व ३१ सिलिंडर अशी एकूण २५९ ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती होणार आहे. 

जागतिक मापदंडानुसार होणार उभारणीप्राणवायू प्रकल्प निर्मिती ही जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या मापदंडानुसार व मार्गदर्शक सूचनेनुसार केली जाणार आहे. मेडिकल ग्रेड ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी आवश्यक इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स, ऑक्सिजनचे उत्पादन ठरलेल्या मापदंडानुसार घेतले जाणार आहे. त्यानुषंगाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले. 

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरOxygen Cylinderऑक्सिजन