शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिका क्षेत्रात शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण अभियान, नेहरू मैदानातून सुरूवात

By प्रदीप भाकरे | Updated: July 5, 2024 17:46 IST

वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार, नेहरू मैदानातून सुरूवात

अमरावती : शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांना मुख्य प्रवाहात सहभागी करण्याच्या उद्देशाने ५ ते २० जुलै या काळात महापालिका क्षेत्रात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे तसेच शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी स्थानिक नेहरू मैदान येथे सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नेहरू मैदानातील पारधी समाज बांधवांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणावेळी अनेक वंचितांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक कलंत्रे यांना शिक्षणाविषयी त्यांच्या पाल्यांच्या समस्या सांगितल्या. याप्रसंगी त्यांचे शिक्षण योग्यप्रकारे होण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. महापालिकेच्या शिक्षण विभागाची टिम व महापालिका क्षेत्रातील विविध व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचे शिक्षक हे सर्वेक्षण अभियान राबविणार आहेत. हे सर्वेक्षण वीटभट्टी परिसर, छत्री तलाव परिसर, नवसारी, धर्म काटा परिसर, गांधी आश्रम, रेल्वे स्टेशन, विविध बांधकामे, सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा, बस स्टेशन इत्यादी ठिकाणी करण्यात येणार आहे. 

मनपा क्षेत्रात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याप्रसंगी समग्र शिक्षाचे कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ, शाळा निरीक्षक ज्योती बनसोड, संध्या वासनिक, क्रीडा निरीक्षक प्रवीण ठाकरे, शाळाबाह्य सर्वेक्षण समन्वयक सुषमा दुधे, धीरज सावरकर, योगेश राणे, संजय बेलसरे, निजामुद्दीन काझी, शुभांगी सुने, दीपाली थोरात तसेच सर्व विशेष शिक्षक, केंद्र समन्वयक व केंद्रातील मुख्याध्यापक उपस्थित होते.

राज्यामध्ये विविध कारणांमुळे बालके शाळाबाह्य होत असतात. या शाळाबाह्य होणाऱ्या व स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या बालकांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून शिक्षण अबाधित राखण्यासाठी ५ ते २० जुलै या कालावधीमध्ये सर्वेक्षण केले जात आहे. त्याबाबतची एसओपी व माहिती संकलनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.- सचिन कलंत्रे, आयुक्त, महापालिका

टॅग्स :Amravatiअमरावती